1. बातम्या

धक्कादायक: विजेची तार अंगावर पडून 11 जनावरे जीवाला मुकली

गेले काही दिवस राज्यात कधी अति तापमानामुळे तर कधी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांची पिके जळून खाख झाल्याच्या कितीतरी घटना घडल्या आहेत.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
11 जनावरे जीवाला मुकली

11 जनावरे जीवाला मुकली

गेले काही दिवस राज्यात कधी अति तापमानामुळे तर कधी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांची पिके जळून खाख झाल्याच्या कितीतरी घटना घडल्या आहेत. कधी कडबा तर कधी उसाचे फड जळल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशीच एक दुर्घटना वाशीम तालुक्यातील अनसिंग येथे घडली आहे.

विजेची तार तुटुन पडल्याने गोठ्यातील जवळजवळ 3 म्हशी, 2 वगार, 1 रेडा आणि 5 बकर्‍या अशी एकूण 11 जनावरे दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनसिंग येथील जुन्या उमरा रस्त्यावर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यावर विजेची तार तुटून पडली होती. या दुर्घटनेत मात्र दुर्दैवाने गोठ्यात बांधलेल्या मुक्या जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे.

काल म्हणजेच 12 जून रोजी दुपारी 4 वाजता च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष किसनसिंह चव्हाण आणि त्यांचे भाऊ मनोज यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यसाय करण्यास सुरुवात केली होती. त्यासोबतच त्यांनी शेळी पालनालाही सुरुवात केली होती. अनसिंग उमरा रस्त्याला लागून असलेल्या शेतात चव्हाण यांनी आपल्या घरासमोर टीनशेड उभारले होते. आणि याच टीनशेडमध्ये त्यांनी जनावरे ठेवले होते.

गव्हाच्या निर्यात बंदीचा परिणाम; किमतीत मोठी घसरण, शेतकऱ्यांची होतेय आर्थिक नुकसान

आणि अचानक काल दुपारी 4 च्या दरम्यान टीन शेडवर विज पुरवठा करणारी तार तुटुन पडली. त्यातून वीज प्रवाह आल्याने जाग्यावरच तब्ब्ल 11 जनावरे दगावली. मुक्या प्राण्यांचे जीव तर गेले सोबतच या दुर्घटनेत चव्हाण यांचे जवळपास 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी आपले सर्वस्व शेतीसाठी वाहून देतात. एवढे कष्ट करूनही बऱ्याचदा त्यांना नुकसानीला सामोरे जावेच लागते. या झालेल्या नुकसानीमुळे कितीतरी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होते. त्यातून आत्महत्येसारख्या घटना घडतात.

महत्वाच्या बातम्या:
डर के आगे जीत है! कांद्याने रडवले तर पातीने हसवले; वाचा भन्नाट शेतकरी दाम्पत्याची यशोगाथा
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर मोदींचा महाराष्ट्रात दौरा; या कार्यक्रमांना लावणार हजेरी

English Summary: Shocking: 11 animals were killed when an electric wire fell on them Published on: 13 June 2022, 10:57 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters