सध्या देशात मोठ्या प्रमाणात पावसाळा सुरू झाला आहे. देशात उशिरा मान्सून दाखल झाल्याने चिंता वाढली होती. मात्र आता मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे उत्तरेकडील राज्यातील डोंगराळ भागात भूस्खलन झाले आहे.
पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार, IMD चा 'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी
तर अनेक राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि दिल्लीत पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज दिवसभरात हिमालयीन प्रदेश, पंजाब, हरियाणा-चंडीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
तसेच उत्तर प्रदेशात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर १० ते १२ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये हिमाचलमधील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर यूपीमध्ये ८, उत्तराखंडमध्ये ६, दिल्लीत ३, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
टोमॅटोसाठी दुकानदाराने तैनात केले बाउन्सर, सांगितले धक्कादायक कारण
शेतकरीच नवरा पाहिजे! उच्चशिक्षित नोकरी करणाऱ्या तरूणीचा हट्ट, वडिलांनी अखेर तिची इच्छा केली पूर्ण..
कृषी जागरणचे राष्ट्रीय व्यासपीठ देशातील शेतकऱ्यांचा करणार सन्मान..
Share your comments