1. बातम्या

शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने सुरू केली बक्षीस योजना, जाणून घ्या...

शेतकऱ्यांनी शेतमाल अधिकाधिक प्रमाणात बाजार समितीत विक्रीस आणण्यासाठी प्रोत्साहन म्हणून अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. आता यामध्ये शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवणाऱ्या बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने आता शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरू केली आहे.

Market committee launched reward scheme for farmers (image google)

Market committee launched reward scheme for farmers (image google)

शेतकऱ्यांनी शेतमाल अधिकाधिक प्रमाणात बाजार समितीत विक्रीस आणण्यासाठी प्रोत्साहन म्हणून अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. आता यामध्ये शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवणाऱ्या बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने आता शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरू केली आहे.

नुकतेच या योजनेचे कूपन ज्येष्ठ संचालक दत्ता पाटील, उपसभापती माणिकराव वाघ, सचिव प्रमोद पुदागे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामध्ये शेतमाल हा आसलगाव बाजार समिती यार्डामध्ये विक्रीस आणावा.

तसेच किमान ३० हजार आणि त्यापेक्षा अधिक शेतमाल विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दोन कूपन देण्यात येणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी या कूपनमधून सोडत काढण्यात येणार आहे.

पावसाळ्यात राज्यातील धरणं कोरडीच, जल आयोगाचा रिपोर्ट प्रसिद्ध, जाणून घ्या...

यामध्ये हजारो रुपयांची ३६ विविध बक्षिसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. प्रथम बक्षीस धान्य स्वच्छ करायचे उभे चाळणी यंत्र, द्वितीय बक्षीस मोठ्या आकाराच्या दोन ताडपत्री, तृतीय बक्षीस तीन फवारणी पंप, चतुर्थ बक्षीस दहा नग किसान टॉर्च, पाचवे बक्षीस २० छत्री आहेत.

लग्न होत नसेल तर टेन्शन घेऊ नका! आता सरकार देतंय लग्न न झालेल्या मुलामुलींना 2750 रुपये मासिक पेंशन, जाणून घ्या...

दरम्यान, सभापती प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वात बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आता प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरू केली. यावेळी महादेवराव भालतडक, उल्हास माहोदे, प्रभात पाटील, नीलेश साबे, बाजार समितीचे गोविंदा वायझोळे, महादेवराव बाठे, सागर पाटील, सुपडा काटोले, पुंडलिक दातीर, संजय घाटे, कर्मचारी, व्यापारी उपस्थित होते.

शेणाशी संबंधित हे व्यवसाय करतील तुम्हाला श्रीमंत, शेतकरी बांधवांनो जाणून घ्या..
छत्रपती कारखान्यावर मोठा राडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की...
आज या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, पुण्यात जोरदार पावसाची शक्यता..

English Summary: Market committee launched reward scheme for farmers, know... Published on: 10 July 2023, 09:36 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters