भारत देशात गव्हाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. जगातील एकूण गहू उत्पादनाचा आढावा घेतला तर त्यात भारताचा मोठा वाटा असल्याचं समोर येईल. मात्र अति तापमानाचा, अवकाळी पाऊस किंवा इतर बऱ्याच कारणांनी पिकांचे नुकसान होत असते. अति तापमानामुळे गहू पिकाचेदेखील बरेच नुकसान होते. गव्हाच्या उत्पादनात घट होण्यापाठीमागे बरीच कारणे असली तरी अति उष्णतेमुळे पिकात घट होत असल्याचा दावा केला जात आहे.
जास्त उष्णतेमध्येही गव्हाचे दर्जावान पीक येईल यासाठी त्यापध्दतीची गव्हाची वाण विकसित करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. दीर्घकाळापासून गव्हाची अशी वाण विकसित करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अखेर ती प्रतीक्षा संपली असून मध्य प्रदेशमधील नर्मदापुरम येथील गहू संशोधन केंद्राने गव्हाच्या दोन नवीन जाती शोधल्या आहेत.
या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे अति तापमानातही चांगले आणि दर्जावान उत्पादन मिळवून देऊ शकते. 1634 आणि 1636 ही गव्हाच्या वीन जातींची नावे आहेत. या नवीन जातीच्या गव्हाचे बियाणे पुढील रब्बी हंगाम म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरपासून बाजारात उपलब्ध होणार असल्याचं सांगितले जातं आहे.
बाप रे! बैलाने तोंडात डबा पकडला आणि नंतर आख्ये शहर घेतले डोक्यावर, जाणून घ्या 'अजब गजब' प्रकार...
गव्हाच्या नवीन वाणांचे संशोधन -
नर्मदापुरम, इंदूर, जबलपूर आणि सागर येथे या नवीन जातींच्या बियाण्यांवर संशोधन करण्यात आले. संशोधनातून असे दिसून आले की, हे नवीन वाण उच्च तापमान असूनही वेळेपूर्वी पिकत नाही. त्यामुळे निश्तिच शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शिवाय तापमान सामान्य राहिले तर ही नवीन वाण
70 क्विंटल पर्यंत उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला आहे.
कृषी शास्त्रज्ञ यांच्या म्हणण्यानुसार, गव्हाची 1634 हे वाण साधारण 110 दिवसांत काढणीसाठी तयार होते. तर गव्हाची 1636 हे वाण 115 दिवसांत काढणीसाठी तयार होते. तसेच ही नवीन वाण चवीला चांगले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो 'शेळी आणि कोंबडी'च्या आहाराची अशी घ्या काळजी; होईल बक्कळ नफा
जगावेगळा अवलिया!! साॅफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडून सुरु केले गाढव फार्म; देशभरात चर्चा
Share your comments