देशाच्या विकासामध्ये शेती (farm) व्यवसायाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे सोपी, जलद गतीने व्हावीत आणि त्यांचे उत्पन्नही वाढावे यासाठी बरेच अभियंते,कृषी शास्त्रज्ञ, अभ्यासक प्रयत्न करत आहेत.असेच एक अनोखे यंत्र राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. मधमाशी पालन (Beekeeping)करणाऱ्यांना हे यंत्र अत्यंत फायदेशीर आहे.
'स्मार्ट हनिकोंब मॉनिटरिंग डिव्हाइस' (Smart Honeycomb Monitoring Device) या यंत्रामुळे मधमाश्यांचे विश्व तसेच मधमाशी मध गोळा करताना किती वेळ घेते तिची क्षमता हे सगळं काही कॅमेऱ्याच्या साहाय्याने उलगडणार आहे. या यंत्राची निर्मिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागात कार्यरत प्राध्यापक डॉ. राधाकृष्ण पंडित, राठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम काकुळते आणि राजूर महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. बाळासाहेब टपले यांनी तयार केले आहे.
यासाठी त्यांनी मधमाशी पालन या विषयात संशोधन केले होते. आता केंद्र सरकारने त्यांना या उपकरणाचे पेटंटही जाहीर केले आहे. हे डिव्हाइस म्हणजे एक प्रकारे मधमाश्यांची पेटी असून यामध्ये आवश्यकतेनुसार कॅमेरे आहेत. तसेच चित्रीकरण साठवण्याची सोयही यात आहे. मधमाशी पालन करताना या उपकरणाद्वारे मधमाश्यांचे चांगल्या पद्धतीने निरीक्षण करण्यासाठी उपयोग होणार आहे.
डॉ. राधाकृष्ण पंडित माध्यमांशी बोलताना म्हणाले , 'स्मार्ट हनिकोंब मॉनिटरिंग डिव्हाइस' हे उपकरण म्हणजे एक मधमाश्यांची पेटी आहे. यामध्ये चार किंवा आवश्यकतेनुसार कॅमेरे आहेत. चित्रीकरण साठवण्याची सोयही आहे.
मधमाशी पालन करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होणार असून या यंत्राद्वारे पुढे आणखी संशोधन करता येईल. तसेच शेतकऱ्यांच्या शेतात हे उपकरण लावल्यास उत्पन्नही वाढेल.
'स्मार्ट हनिकोंब मॉनिटरिंग डिव्हाइस'चे फायदे
शत्रूपासून मधमाशांचे रक्षण करत त्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी हे उपकरण महत्वाची भूमिका बजावते. तसेच या उपकरणामुळे मधमाशी पालनातील उत्पादन क्षमता वाढणार असल्याचे डॉ. पंडित यांनी सांगितले. सरकारद्वारे या उपकरणासाठी ‘पेटंट’ जाहीर झाले आहे. त्यामुळे या उपकरणाचा व्यावसायिक उत्पादन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डॉ. राधाकृष्ण पंडित यांच्याबद्दल
डॉ. राधाकृष्ण पंडित यांना एकूण २९ वर्षांचा अध्यापनाचा आणि संशोधनाचा अनुभव आहे. तसेच त्यांनी यापूर्वी बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला होता . त्यांचा याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. डॉ. पंडित हे विद्यापीठाच्या अधिसभेचेही सदस्य आहेत.
महत्वाच्या बातम्या:
पीक विमा: एका कृषी अधिकाऱ्यामुळे हजारो शेतकरी पीक विम्यापासून राहणार वंचित
Spider Plant: घरी लावा स्पायडर प्लांट; 'या'' मोठ्या समस्यांपासून मिळवा मुक्ती
Share your comments