मळणी यंत्राची रचना, निगा व देखभाल

05 April 2020 07:59 AM


कृषी यांत्रिकीकरणामध्ये मळणी यंत्र हे एक प्रमुख यंत्र आहे. मळणी यंत्र खरेदी करत असाल तर त्याची रचना माहित असणे आवश्यक आहे तसेच त्याचा वापर कसा करावा. मळणी यंत्र हे वर्षभर वा सतत चालणारे यंत्र नाही ते सुगी पुरतेच चालते त्यामुळे त्याची निगा व देखभाल कशी राखावी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.

मळणी यंत्राची रचना

मळणी यंत्रामध्ये ड्रम, सिलेंडर, चाळणी आणि पंखा यांचा समावेश असतो.

 • ड्रम: मळणी यंत्रातील ड्रम बर्हिगोल असतो. या ड्रममध्येच शेंगा, कणीस, अवेष्टयांचे दाणे वेगळे केले जातात.
 • सिलेंडर: ड्रमच्या आतील भागात सिलेंडर बसविलेला असतो. दाणे वेगळे करण्यासाठी त्यावर वेगवेगळया प्रकारचे दाते बसविलेले असतात.
 • चाळणी: वेगवेगळया पिकानुसार (दाण्याच्या आकारानुसार) वापरल्या जातात.
 • पंखा: पंखा हा चाळणीखाली बसविलेला असतो. यांच्या सहाय्याने दाण्यापासून भुसा वेगळा केला जातो व भुसा जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरला जातो.

मळणी यंत्राची कार्यपध्दती 

मळणी यंत्रातील सिलेंडर आणि पंखा एकाच वेळी ट्रॅक्टर, इंजिन, पावर टिलर किंवा इलेक्ट्रीक मोटारच्या शक्तीचा वापर करुन फिरवले जातात. कणसे किंवा ओंब्या जेव्हा वेगाने फिरणाऱ्या सिलेंडर आणि स्थिर ड्रममध्ये येतात तेव्हा घर्षणामुळे दाणे वेगळे होतात व चाळणी पडतात आणि पंख्याच्या सहाय्याने भुसा वेगळा केला जातो. महत्त्वाचे म्हणजे स्थिर ड्रम व सिलेंडर यांच्यातील अंतर पिकानुसार ऍ़डजस्ट करावे, त्यामुळे कार्यक्षमता वाढते.

मळणी यंत्राच्या कार्यपध्दतीचे तंत्र व देखभाल

 • मळणी ड्रमची गती कशी निवडावी:
  मळणी ड्रमची गती वाढविल्यास लागणारी उर्जा व दाणे तुटण्याचे प्रमाण कमी होते, परंतु एकूण धान्याचा अपव्यय वाढतो. यात स्वच्छ धान्य, मळणी झालेले धान्य तसेच मळणी न करता वाया गेलेले धान्य तसेच मळणी न करता वाया गेलेले धान्य याचा समावेश होतो.याउलट ड्रमची गती कमी केल्यास मळणीयंत्राची क्षमता, धान्य स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते व धान्य वाया जाण्याचे प्रमाण वाढते.ब्युरो ऑफ इंडिय स्टॅण्डर्ड (BIS) ने प्रमाणीत केल्यानुसार मळणी यंत्राद्वांरे होणारे एकूण धान्य तोटा हा 5 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, तसेच दाणे फुटण्याचे प्रमाण 2 टक्क्यापेक्षा कमी असावे.

अ.क्र

पिकाचे नाव

ड्रमची गती (मि/सेकंद)

1.

सोयाबीन

8-10

2.

बाजरी

15-20

3.

ज्वारी

15-20

4.

मका

9-12

5.

गव्हू

20-25

6.

भात

15-20

 

 • मळणी ड्रम व जाळीतील फट:
  फिरणारा सिलेंडर व ड्रम यांमधील अंतर सामान्यत: 12-30 मिमी  इतके असावे. हे अंतर कमी असल्यास धान्याबरोबर त्याचे काडी मळले जाते त्यामुळे अधिक प्रमाणात ऊर्जा लागते.

 • ब्लोअर/पंखा/अॅस्पिरेटर अॅडजस्टमेंट:
  निर्मात्याच्या शिफारशीनुसार गती निश्चीत करावी. ही गती कमी जास्त करण्यासाठी फॅन पुली किंवा ड्राइव्ह पुली कमी जास्त व्यासाची वापरावी. फॅनची गती जास्त झाल्यास भुश्याबरोबर धान्यही फेकले जाऊ शकते किंवा कमी झाल्यास धान्यात भुसा मिसळला जातो.

 • चाळणीची ठेवण:
  मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीची साईज, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ्या यंत्राची गती आणि जाळी हलवण्याचे अंतर या गोष्टींवर अवलंबून असते. सामन्यत: चाळणीचा उतार 2 ते 6 अंश असावा तसेच चाळणी हलविणाऱ्या यंत्राचा वेग 300 ते 400 फेरे/मिनिट असावा आणि चाळणी हलण्याचे अंतर 15 ते 25 सेमी दरम्यान असावे.


मळणी
यंत्र वापरतांना घ्यावयाची काळजी

 • सुरक्षित मळणी करण्यासाठी ISI मार्क असलेलेच मळणी यंत्र वापरावे.
 • पिकाची मळणी करण्यापूर्वी पूर्णपणे वाळलेले असावे.
 • पिक मळणीची जागा राहत्या घरापासून दूर व समतोल असावी.
 • रात्री मळणी करतांना योग्य प्रमाणात उजेड असेल तरच मळणी करावी.
 • मळणी यंत्राची दिशा अशा प्रकारे ठेवावी कि बाहेर पडणारा भुसा व वाऱ्याची दिशा एकच राहिल.
 • सर्व नटबोल्ट व्यवस्थित घट्ट बसवावे.
 • यंत्रामध्ये पिकाची टाकणी एकसारखी व एकप्रमाणात असावी.
 • यंत्राच्या जाळ्यांची वरचेवर पाहणी करावी व स्वच्छ कराव्यात.
 • 8-10 तासानंतर मळणी यंत्रास थोडी विश्रांती द्यावी.
 • मळणी सुरु करण्यापूर्वी यंत्र मोकळे चालवून यंत्राचा कोणता भाग घासत नसल्याची खात्री करुन घ्यावी, असल्यास निर्मात्याने दिलेल्या शिफारशीनुसार बदल करावे.
 • मळणी करतांना सैल कपडे घालू नये.
 • मळणी यंत्रात पिक टाकतांना चालकाने हात सुरक्षित अंतरावर ठेवावे.
 • चालकाने मद्यपान केलेले नसावे किंवा त्या ठिकाणी धुम्रपान करु नये, तसेच जवळ पाणी व वाळु ठेवावी कारण कधी कधी आग लागण्याची शक्यता असते.
 • सामन्यत: BIS ने प्रमाणित केलेले सुरक्षित फिडींग वापरावे.
 • बेअरिंग किंवा वळणाऱ्या पार्टला वंगण द्यावे तसेच बेल्ट तणाव चेक करावा.

 
मळणीयंत्र चालवितांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय

अ.क्र

अडचणी

उपाय

1.

दाणे व्यवस्थित वेगळे न होणे

अ. सिलेंडर स्पीड वाढवावे.
ब. ओले पीक असेल तर मळणीयंत्रात टाकू नये.
क. मळणीयंत्र व ड्रम मधील अंतर कमी ठेवावे.

2.

दाणे तुटण्याचे प्रमाण वाढणे

अ. जास्त प्रमाणात फिडींग करु नये.
ब. ओले पीक असेल तर मळणीयंत्रात टाकू नये.

3.

धान्य/दाणे भुश्याबरोबर उडणे

अ. पंख्याची गती कमी करणे.

4.

धान्य/दाणे यात भुसा येणे

अ. पंख्याची गती वाढवावी.
ब. चाळणी हलणाऱ्या यंत्राची गती वाढवावी.
क. एकसारखी/समप्रमाणात पीक टाकावे.
ड. पिकानुसार विशिष्ट आकाराच्या चाळण्या वापराव्यात.

5.

वरच्या चाळणीवर दाण्याचे प्रमाण वाढणे

अ. चाळणीचे छिद्र बंद झाले असल्यास ते साफ करावे.
ब. चाळणीचा उतार कमी करावा.
क. पिकानुसार विशिष्ट आकाराच्या चाळण्या वापराव्यात.

6.

मळणी ड्रम जाम होणे

अ. जास्त प्रमाणातील फिडींग टाळावी.
ब. सर्व बेल्टचा तणाव तपासावा.
क. सिलेंडरची गती वाढवावी.
ड. वाळलेले पिकाचीच फिडींग करावी.
इ. मळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पिकात गवत असेल तर ते काढून घ्यावे.
फ. सिलेंडर व ड्रमचे अंतर व्यवस्थित करावे.


लेखक:

इंजी. वैभव सूर्यवंशी
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)
9730696554 

Agricultural Mechanization thresher malani yantra थ्रेशर मळणी यंत्र कृषी यांत्रिकीकरण ISI आयएसआय
English Summary: Design selection use care and maintenance of thresher machine

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.