पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोमवारी पीएम केअर्स फोर चिल्ड्रन्स स्कीम अंतर्गत शालेय मुलांसाठी शिष्यवृत्ती, आरोग्य कार्ड आणि इतर सुविधा सुरू करणार आहे.
पंतप्रधान मोदी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्स कार्यक्रमाद्वारे अनेक मुलांना शिष्यवृत्ती हस्तांतरितकरून याची सुरुवात करतील.केंद्र सरकारने गेल्यावर्षी 29 मे रोजी ही योजना सुरू केली.परंतुकोरोना संसर्गामुळे 11 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत ज्या मुलांनी आपले पालक गमावले आहेत अशा मुलांना मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
मंत्रालयाने एका निवेदनात या बाबतीत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिष्यवृत्ती शालेय मुलांच्या खात्यात हस्तांतरित करतील. या योजनेअंतर्गत मुलांना पासबुक आणि आयुष्यमान भारत अर्थात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य कार्ड देखील दिले जातील.
पुढे निवेदनात असे देखील म्हटले आहे की, ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या उपक्रमात मुले त्यांचे पालक व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी सहभागी होणार आहेत.राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री,खासदार आणि आमदार देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या योजनेचा उद्देश हा मुलांना अन्न आणि निवारा प्रदान करून त्यांची सर्वसमावेशक काळजी आणि संरक्षण सुनिश्चित करणे हा आहे.
अशा मुलांना शिक्षण आणि शिष्यवृत्ती द्वारे सक्षम करणे आणि वयाच्या 23व्या वर्षी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देऊनत्यांना स्वावलंबी बनवणे.योजना आरोग्य विम्याच्या माध्यमातून अशा मुलांच्या आरोग्याचीही काळजी घेते.
याअंतर्गत त्या मुलांना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे. सरकारने मुलांच्या नोंदणीसाठी pmcaresforchildren.in हे पोर्टल गेल्या वर्षी सुरू केले होते. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी यावर्षीसंसद एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की पीएम केअर फोर चिल्ड्रन योजने अंतर्गत एकूण 6624 अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी3855 अर्ज छाननीनंतर करण्यात आले आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक 1158 अर्ज आले आहेतव त्याखालोखाल उत्तर प्रदेशात 768,मध्यप्रदेश 739त्याची अर्जांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
Share your comments