1. सरकारी योजना

अनुदानाचा फायदा घ्या सौर कृषी पंप बसवा! सर्वसाधारणासाठी 90 टक्के तर अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी 95 टक्के अनुदान

सौर ऊर्जा हा ऊर्जेचा निरंतर आणि स्वच्छ स्त्रोत असूनयेणारा भविष्यात सौरऊर्जे शिवाय पर्याय नाही.मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिले की कोळसा टंचाईमुळे विजेची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
central goverment give 90 percent  subsidy for solar agri pump installment

central goverment give 90 percent subsidy for solar agri pump installment

सौर ऊर्जा हा ऊर्जेचा निरंतर आणि स्वच्छ स्त्रोत असूनयेणारा भविष्यात सौरऊर्जे शिवाय पर्याय नाही.मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिले की कोळसा टंचाईमुळे विजेची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती.

कोळशाच्याभरमसाठ वापरामुळे भविष्य काळामध्येकोळसा साठे संपण्याची भीती आहे. त्यामुळे सौर ऊर्जा हा एकच पर्याय सगळ्यांसमोर उरणार आहे. त्याच दृष्टिकोनातून सरकारचे देखील प्रयत्न असून सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आखण्या कडे  व त्यांची अंमलबजावणी करण्याकडे सरकारचे पुरेपूर लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर महा कृषी या अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान कुसुम घटक योजनेतून जवळजवळ पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी अनुदान देण्यात येणार आहे. महा ऊर्जा च्या पोर्टल वर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी 31 मे पर्यंतमुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महा उर्जा चे विभागीय महाव्यवस्थापक वैभव कुमार पाथोडे यांनी दिली.

यामध्ये शेतकऱ्यांच्या जमीनधारणा क्षमतेनुसार तीन एचपी, पाच आणि साडेसात एचपी  डीसी सौर पंप देण्यात येणार आहेत. ज्या अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा शेतकऱ्यांनीत्यांच्या हिश्श्याची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर द्वारे भरायचे आहे.तसेच जी रक्कम भराल त्या रकमेचा यूएसीआर क्रमांक असलेली कॉपीकुसुम पोर्टल वर अपलोड करायचे आहे.

 या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे अनुदान

 सौर कृषी पंपासाठीसर्वसाधारण गटातील लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या किमतीच्या दहा टक्के,अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना कृषी पंपाच्या किमतीचे पाच टक्केलाभार्थी हिस्सा भरायचा आहे.तर संबंधित सौर कृषी पंपाची उरलेली रक्कमसर्वसाधारण गटासाठी90 टक्केआणि अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी 95 टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे.

 सौर कृषी पंपाचे फायदे

1- खर्च कमी- सौर उर्जेवर चालणाऱ्या कृषी पंप लावल्यानंतर इतर ऊर्जा स्त्रोतांची गरज राहत नाही. सौर कृषी पंपासाठी फक्त सूर्यप्रकाश आणि सोलर पॅनल ची आवश्यकता असते. या पंपाच्या साहाय्याने आपण जमिनीच्या कुठल्याही कोपऱ्यात पिकांना पाणी पोहोचवू शकतो.

2- सोपे आणि विश्वसनीय- सौरऊर्जेच्या मदतीने कृषीपंप चालवणे फार सोपे आहे.कारण यामध्ये फार कमी प्रमाणात उपकरणाची आवश्यकता असते तसेच पारंपारिक कृषी पंप प्रमाणे विजेची कपात,कमी होल्टेज यासारख्या समस्या येत नाहीत त्यामुळेज्या ठिकाणी विजेचा पुरवठा होत नाही अशा ठिकाणी सौर कृषी पंप एक वरदान ठरत आहेत.

3- पर्यावरणासाठी अनुकूल-सौर कृषी पंपामुळे कुठल्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायू प्रदूषण होत नाही. हेपर्यावरणासाठी अनुकूल आहे.कारण सौर कृषी पंपला कुठल्याही इंधन आणि चालवले जात नाही.त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.तसेच कुठल्याही हानिकारक पदार्थ वातावरणात सोडला जात नाही.

4- आर्थिक लाभासाठी फायदेशीर- सौर कृषी पंपाच्या वापरामुळे जास्त खर्च येत नाही.

सौर पॅनल मुळे तयार झालेली जास्तीची ऊर्जा ऊर्जा ग्रीडला विकून उत्पन्नात एक चांगला स्त्रोत निर्माण होऊ शकतो.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Good News: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी,नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी करावे संधीचे सोने

नक्की वाचा:ही माहिती असणे गरजेचे! तलाठीला कोणते अधिकार असतात? कोणते नसतात? वाचा सविस्तर

नक्की वाचा:केंद्र सरकारच्या या योजनेत 10 टक्के रक्कम भरून घरी बसवा सोलर प्लांट, उर्वरित 90 टक्के रक्कम भरेल सरकार

English Summary: central goverment give 90 percent subsidy for solar agri pump installment Published on: 16 May 2022, 09:07 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters