1. शिक्षण

दहावी,बारावी निकाल अपडेट: इयत्ता बारावीचा निकाल 10 जून पर्यंत तर दहावीचा निकाल 20 जून पर्यंत होणार जाहीर

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे ती म्हणजे, बारावीचा निकाल 10 जून पर्यंत तर इयत्ता दहावीचा निकाल 20 जून पर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
ssc and hsc result date declare

ssc and hsc result date declare

 दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे ती म्हणजे, बारावीचा निकाल 10 जून पर्यंत तर इयत्ता दहावीचा निकाल 20 जून पर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या पेपरांचे तपासणीचे काम सध्या पूर्ण होत आले असून आता दहावी आणि बारावीचा निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे 10 जून पर्यंत बारावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणारा असून दहावीचा निकाल 20 जून पर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. पेपर तपासणी कामावरशिक्षकांच्या बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना होती. परंतु जून महिन्यातच दोनही परिक्षांचे निकाल लागणार असल्याची माहितीशिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.नियमानुसार परीक्षेतील शेवटच्या पेपर च्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर करण्याची प्रामाणिक प्रक्रिया आहे पण यावेळी इयत्ता बारावीची परीक्षा पंधरा दिवस उशिरा सुरू झाली होती, त्यामुळे  बारावीचा निकाल 10 जून पर्यंत जाहीर होईल, असे बोर्डाने म्हटले आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर दहादिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

यावर्षी इतकी होती विद्यार्थ्यांची संख्या

 जर आपण मागच्या वर्षी चा विचार केला तर कोरोना महामारी च्या संकटामुळे परीक्षा झाल्यानव्हत्या.परंतु या वर्षी दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू झाल्या व चार एप्रिल 2022 रोजी संपली. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती वयातील आठ लाख 89 हजार 584 विद्यार्थी आणि 7 लाख 49 हजार 887 विद्यार्थिनी यांनी परीक्षा दिली होती. शिक्षण बोर्डाने  आता निकालाची संभाव्य तारीख जाहीर केल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांसमोर असलेली निकालाची चिंता काहीशी मिटली आहे.

महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब्लेट; या सरकारचा निर्णय

नक्की वाचा:भावा फक्त तूच रे…! 10 गुंठ्यात ब्रॉकोली लागवड केली अन मिळवलं 2 लाखांचे उत्पन्न; वाचा काय होतं नियोजन

नक्की वाचा:Aadhar Card : फक्त 50 रुपयात बनवा PVC आधार कार्ड; कसं बनवणार वाचा

English Summary: ssc and hsc result declare will be after tenth june says shikshan mandal Published on: 09 May 2022, 08:48 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters