Latur District : पावसाने हजेरी लावल्यामुळे आता सगळीकडे बियाणे आणि खताचे नियोजन करण्याची लगबग सुरु झाली आहे. सध्या राज्यात खत बियाणांबाबत शेतकऱ्यांची बरीच लूट केली जात आहे. कधी बोगस बियाणे देऊन तर कधी अधिक दराने बियाणे विकून शेतकऱ्यांना फसवले जात आहे. यात शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होत आहे. ही लूट थांबावी यासाठी राज्य सरकार,व कृषी विभाग सज्ज झाले आहेत. आतापर्यंत बऱ्याच कृषी केंद्रांवर कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून त्यांच्यावर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करुन बियाणांची विक्री करणे तसेच बियाणे कंपनीने कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
लिंकिंग पध्दतीने केली जात होती खतांची विक्री
खताच्या नोंदी नसल्यामुळे कृषी विभागाने तीन खत विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द केले आहेत. लातूर जिल्ह्यातील पिंपळगाव, लातूर व मांजरी भागातील विक्रेत्यांचा समावेश आहे. लिंकिंगसोबतच इतर अनेक गोष्टी नियमबाह्य असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. हंगामाला सुरुवात होण्याआधीपासूनच शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रयत्न केला जात होता. आता हंगाम सुरु झाला असून शेतकऱ्यांना फसवण्याचे प्रकार जास्त घडत आहेत. त्यामुळे भविष्यात यापेक्षाही कडक कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.
‘लिंकिंग’ म्हणजे काय?
जर तुम्हाला डीएपी खताची खरेदी करायची असेल तर या खतासोबत दुसरे एक खत किंवा कृषी सेवा केंद्रातील अन्य वस्तू , साहित्य यांची खरेदी करावी लागते. या डीएपी खताला शेतकऱ्यांची अधिक मागणी असते. मात्र शेतकऱ्यांनी डीएपी खताचीच खरेदी मोठ्या प्रमाणात केली तर इतर खतांचे काय करणार? म्हणूनच व्यापाऱ्यांनी लिंकिंग सारखा मधला मार्ग शोधून काढला. याला कृषी विभागाने विरोध केला असून असे केल्यास कारवाई करण्याचे आदेश सुनावले आहे.
खत-बियाणांबाबत अनियमितता
कृषी विभागाने 9 भरारी पथकांची नेमणूक केली आहे. खरीब हंगाम सुरु होण्यापूर्वीच जिल्ह्यातील खत-बियाणांबाबत अनियमितता आढळून आल्यामुळे या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारची अनियमितता वाढू नये यासाठी कृषी विभागाकडून काळजी घेतली जात आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वीच खताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी अफवा पसरवली जात आहे तसेच तुटवडा निर्माण झाल्यास खतांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकेल असे चित्र निर्माण केले जात आहे. या प्रक्रियेवर निर्बंध घालण्यासाठी भरारी पथक तैनात करण्यात आले आहे.
मान्सूनपूर्व पावसाची शेतकऱ्यावर अवकृपा; शेतकऱ्यांची सरकारकडे 2 लाखांची मागणी
कारवाई का झाली?
मागणीनुसार तसेच ठरवून दिलेल्या दरातच खत-बियाणे शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव, मांजरी व लातूर येथील कृषी सेवा केंद्राच्या गोदामात डीएपी खताचा साठा असूनही दुकानासमोरील फलकावर त्याचे दर नव्हते. तसेच खताची विक्रीचे नियम देखील पाळले जात नव्हते. खताची विक्री बिलांवर शेतकऱ्यांची स्वाक्षरी न घेताच केली जात होती. शिवाय खताबरोबर इतर वस्तू घेण्याची सक्ती करण्यात येत होती. त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
अबब! जखमी माकडीण थेट आली क्लीनिकमध्ये; आगळ्यावेगळ्या प्रकाराची राज्यभर चर्चा
शेतकऱ्यांनो काळजी घ्या; झाडाचा आसरा घेणं मेंढपाळ्याला पडलं महागात...
Share your comments