पिकाचा दर्जा आणि गुणधर्म यामुळे त्या पिकाला मानांकन भेटते आणि त्या पिकास योग्य ती बाजारपेठ आणि दर ही मिळतो. सांगलीच्या हळद तसेच बेदाणा पिकांना भौगोलिक मानांकन मिळाला आहे. या मालाची गणना व्हावी यासाठी शेतकरी वर्ग पुढे येत आहेत. या भौगोलिक मानांकणाचा फायदा तेथील परिसरातील शेतकऱ्याना व्हावा असे कृषी विभागाचा उद्देश आहे. सांगली कृषी विभागाकडे जवळपास ७०० प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रस्तावाला परवाना मिळाला की याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
असे झाले आहेत प्रस्ताव दाखल :-
सांगली येथील हळद तसेच बेदाणा पिकाला भौगोलिक मानांकन भेटले आहे आणि याच ब्रँड खाली सांगलीतील ५५० प्रस्ताव हळद उत्पादक शेतकऱ्यांचे तर १८० प्रस्ताव बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी विभागाकडे दाखल झाले आहेत. एकदा की हे दाखल झालेले प्रस्ताव मंजूर झाले की तेथील हळद उत्पादक आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
मानांकान अधिकृत वापरकर्ता बनण्याची काय आहे प्रक्रिया :-
भौगोलिक मानांकन वापरकर्ता होयचे असेल तर चेन्नई मधील मानांकन कार्यालयात आपणास नोंदणी करावी लागते. तुम्हाला नोंदणी करायची असेल तर ती फक्त जानेवारी ते मार्च च्या दरम्यान च सुरू होते. हे मानांकन नोंद करायची असेल तर त्या शेतकऱ्यास फक्त १० रुपये खर्च आहे. जर शेतकऱ्यांना याचा वापरकर्ता व्हायचा असेल तर कृषी विभागाकडे जाऊन तुम्हाला १० रुपये खर्च येणार आहे मात्र जर तुम्ही खाजगी कार्यालयात गेला तर जवळपास ३ हजार रुपये खर्च आहे.
काय होतो फायदा ?
कोणत्याही पिकाला जर भौगोलिक मानांकन भेटले तर त्या मालाची एक वेगळी ओळख तसेच वेगळी गुणवत्ता निर्माण झालेली असते. त्या मालाला एक दर्जा प्राप्त होतो तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा एक वेगळी ओळख निर्माण होते. लहे मानांकन केंद्र सरकारच्या "औद्योगिक धोरण व प्रोत्साहन" या विभागाद्वारे हे मानांकन जाहीर करण्यात येते. उत्पादनाची एक वेगळी ओळख निर्माण होते.
Share your comments