महाराष्ट्रात सुमारे 10,000 पाऊस मोजणारी यंत्रे बसवण्यात येणार आहेत, ज्यामुळे हवामानाची अचूक माहिती रिअल टाइममध्ये मिळेल, अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी दिली.
राज्यात सध्या 2,200 पर्जन्यमापन यंत्रे आहेत, मात्र हा आकडा 10,000 पर्यंत नेण्याचा सरकारचा विचार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी खरीप हंगामपूर्व बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. येत्या मान्सून हंगामात राज्यात ९६ टक्के पाऊस पडेल. यंदा पाऊस पडल्याने टंचाई भासणार नाही. शिवाय युरिया, बियाणे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल,” असंदेखील अब्दुल सत्तार म्हणाले.
शेतकऱ्यांना ड्रोन सवलतीच्या दरात दिले जाणार
राज्यात नॅनो युरिया फवारण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. ड्रोन सवलतीच्या दरात पुरवले जातील आणि चालकांना राहुरी कृषी विद्यापीठात १५ दिवस प्रशिक्षण दिले जाणार असल्याचंही त्यानीं सांगितलं.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, “पीक नुकसानीचे जवळपास ७० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. राज्यातील काही भागात पाऊस थांबला की, आम्ही उर्वरित सर्वेक्षण आठवडाभरात पूर्ण करतो".
राज्यात 10,000 पाऊस मोजणारी यंत्रे
पीटीआयशी बोलताना कृषी आयुक्त सुनील चव्हाण म्हणाले की, “हा प्रकल्प विचाराधीन आहे आणि आम्ही राज्यात 10,000 पाऊस मोजणारी यंत्रे बसवण्याची योजना आखत आहोत. यासाठी चार ग्रामपंचायतींसाठी एक मशीन बसविण्यात येणार आहे.
हे यंत्र केवळ पावसाबद्दलच नाही, तर वाऱ्याचा वेग आणि हवामानाच्या इतर बाबींचाही डेटा देईल". या प्रकल्पासाठी खासगी कंपनीची मदत घेतली जाईल, तर राज्य सरकार त्यासाठी जमीन उपलब्ध करून देणार असल्याचं कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितलं.
हा अहवाल पीटीआय वृत्त सेवेकडून स्वयंचलितपणे तयार करण्यात आला आहे.
अधिक बातम्या:
Unseasonal Rain: भर पावसात छत्री घेऊन कृषी मंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर
शेतकऱ्यानं करून दाखवलं! अनंतराव पारवेंची शेवगा शेतीत यशस्वी झेप
काय सांगता! गायीने दिला 'सिंहाच्या बछड्याला' जन्म, जबडा आणि पंजा पाहून सर्वच हैराण..
Share your comments