1. बातम्या

शेतकऱ्यानं करून दाखवलं! अनंतराव पारवेंची शेवगा शेतीत यशस्वी झेप

खरंतर शेती करणं जिकिरीचं काम आहे. कारण तुम्ही सध्या बघताय की अवकाळी पावसामुळे आणि गारांमुळे पिकं अक्षरशः उद्धवस्त झाली आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षीच या नैसर्गिक लहरीपणाचा सामना करावा लागतो.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
अनंतराव पारवेंची शेवगा शेतीत यशस्वी झेप

अनंतराव पारवेंची शेवगा शेतीत यशस्वी झेप

खरंतर शेती करणं जिकिरीचं काम आहे. कारण तुम्ही सध्या बघताय की अवकाळी पावसामुळे आणि गारांमुळे पिकं अक्षरशः उद्धवस्त झाली आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षीच या नैसर्गिक लहरीपणाचा सामना करावा लागतो. एकीकडे राज्यात अशी अवस्था असताना दुसरीकडे परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील शेतकऱ्याने शेतीतून भरघोस असं उत्पादन घेतलं आहे.

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील नांदेड पूर्णा रोडवर असलेले गौर हे गाव खरंतर श्री सोमेश्वर महारुद्र देवस्थानामूळे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. शिवाय या भागातील शेतकरी अनेक वर्षांपासून भाजीपाल्याची शेती करतायेत. अगदी या भागात बारामाही भाजीपाला शेतीतून शेतकरी बंधू चांगले असं उत्पादन घेत आहेत .

आणि याच गावातील मधूकर बाबाराव पारवे,अनंतराव बाबाराव पारवे आणि केशवराव बाबाराव पारवे हे गेल्या कित्येक वर्षांपासून भाजीपाला तसेच फूलशेतीतून भरघोस असं उत्पादन घेत आहेत. भाजीपाला शेतीत त्यांनी यशस्वी अशी झेप घेतली आहे.

यशोगाथा
पदवीधर असलेले अनंतराव बाबाराव पारवे यांची या भागात बरीच चर्चा होताना दिसतीये. कारण या प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीत एक नवा विक्रमच केलाय, आजच्या या लेखातून तुम्हाला पारवे कुटूंबियांची यशोगाथा जाणून घेता येणार आहे. शेतकरी अनंतराव यांनी आपल्या गौर शिवारातील गट क्रमांक ७४ मध्ये एक एकर क्षेत्रात तीन वर्षापूर्वी पीकेएम-१ या वाणाचे शेवगा बियाणे बारा फूट रुंदी आणि सहा फूट लांबी अंतरावर टोकण अशा पध्दतीने लागवड केली.

शेवगा झाडांचे शास्त्रोयुक्त पध्दतीने आणि अगदी पोटच्या लेकराप्रमाणे शेवगा पीकाची काळजी त्यांनी घेतली. योग्यवेळी खतमात्रा,पाणीपाळ्या,रोगनियंत्रण,
तणविरहीत,आंतरमशागत असे व्यवस्थापन करुन त्यांनी शेवग्याचे विक्रमी असे उत्पादन घेतले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते शेवग्याची लागवड करत आहेत. आणि उत्पादीत झालेला शेवगा शेंगाची काढणी करुन ते परभणी, नांदेड,वसमत,पूर्णा बाजारपेठत नेवून विक्री करतायेत.

गेल्या तीन वर्षाच्या तीन शेवगा क्राॅप बहारातून उत्पादन खर्च १ लाख रुपये वगळता शेंगा विक्रीतून आजतागायत त्यांना ५ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. तसेच यापुढे क्राॅपच्या शेवटपर्यंत ५ टन उत्पादन अपेक्षित असल्याचं त्यांनी कृषी जागरांशी बोलताना सांगितले.

एकंदरीत शेतकरी अनंतराव पारवे यांनी आपल्या शेवगा शेतीतून कृषोकन्नती साधत इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्शच निर्माण केला आहे. त्यांचा हा शेंगांनी लदबदून गेलेला शेवगा प्लाॅट नांदेड पूर्णा रस्त्यावरुन जातानाच लक्ष वेधून घेतोय. तुमच्यासाठी ही माहिती आणली होती आमचे प्रतिनिधी आनंद ढोणे पाटील यांनी .


अधिक बातम्या:
तुम्ही ब्रोकोली लागवड करण्याच्या विचारात आहात का? ; मग एकदा परभणीच्या शेतकऱ्याची यशोगाथा नक्की वाचा
काय सांगता! गायीने दिला 'सिंहाच्या बछड्याला' जन्म, जबडा आणि पंजा पाहून सर्वच हैराण..
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुण्यात पावसाला सुरुवात, दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी...

English Summary: The farmer did it! Anantrao Parve's successful leap in Shevga farming Published on: 28 April 2023, 04:19 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters