1. बातम्या

Drone Startup : ड्रोन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार सबसिडी! या स्टार्टअपमध्ये महेंद्रसिंग धोनीची गुंतवणूक

Drone Startup : भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी-समर्थित ड्रोन स्टार्टअप गरुड एरोस्पेस त्याच्या कृषी ड्रोनसाठी कृषी अनुदान मिळवणारे पहिले स्टार्टअप बनले आहे. ही सबसिडी अॅग्री ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकाराचा एक भाग आहे.

Drone Startup

Drone Startup

Drone Startup : भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी-समर्थित ड्रोन स्टार्टअप गरुड एरोस्पेस त्याच्या कृषी ड्रोनसाठी कृषी अनुदान मिळवणारे पहिले स्टार्टअप बनले आहे. ही सबसिडी अॅग्री ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकाराचा एक भाग आहे.

याशिवाय ही सबसिडी गरुडा एरोस्पेसला ऑपरेशन्सचा विस्तार करण्यास आणि त्यांच्या ड्रोनला भारतातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल. या अनुदान योजनेअंतर्गत डीजीसीएने मंजूरी दिलेले 'गरुड किसान ड्रोन'चे मंगळवारी ११ एप्रिल रोजी पुण्यात ८ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत.

कशी आहे ही योजना

कृषी ड्रोन सबसिडी ही कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार ड्रोन खरेदीसाठी आर्थिक मदत करणार आहे. योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान प्रत्येकासाठी वेगवेगळे आहे.

या विभागांना मिळणार १०० टक्के सबसिडी (१० लाख रुपये)

इंडियन काऊन्सिल आँफ अॅग्रीक्लचरल रिसर्च

कृषि विज्ञान केंद्र

स्टेट अॅग्रीकल्चर यूनिव्हर्सिटी

स्टेट अँड केंद्र सरकारचे कृषी विभाग

डिपार्टमेंट्स अँड पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग

सरकारी कर्मचाऱ्यांवर पडणार पैशांचा पाऊस! 'या' तारखेला खात्यात येणार 1 लाख 20 हजार रुपये

धोनीने नोव्हेंबर-२०२२ मध्ये 'किसान ड्रोन' लॉन्च केले

गेल्या वर्षी नोव्हेंबर-२०२२ मध्ये धोनीने गरुड एरोस्पेसचे स्वदेशी उत्पादन 'किसान ड्रोन' लॉन्च केले होते. हे बॅटरीवर चालणारे ड्रोन आहे जे दररोज ३० एकर जमिनीवर कृषी कीटकनाशकांची फवारणी करण्यास सक्षम आहे.

तामिळनाडू स्थित अग्निश्वर जयप्रकाश हे ड्रोन स्टार्टअप गरुडा एरोस्पेसचे संस्थापक आणि सीईओ आहेत. दरम्यान, महेंद्रसिंग धोनीनेही या कंपनीत गुंतवणूक केली असून तो या कंपनीचा ब्रँड अँम्बेसिडर आहे.

सरकारने कर्मचाऱ्यांना दिला 440 व्होल्टचा शॉक, होणार मोठे नुकसान

ड्रोनचा शेतीत वापर

भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत सातव्या क्रमांकाचा देश आहे. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नसुरक्षा पुरवणे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यामुळेच पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक आणि तांत्रिक शेतीचा विस्तार करणे आवश्यक आहे. शेतीचा वाढता खर्च आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकर्‍यांचेही शेतीचे नुकसान होत आहे.

अशा परिस्थितीत ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाद्वारे केलेली अचूक शेती देशातील शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय देऊ शकते. ड्रोनचा वापर करून शेतकरी कमी खर्चात आणि वेळेची बचत करून त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात. पारंपारिक पद्धतीने कीटकनाशकांची फवारणी केल्यास आरोग्यावर परिणाम होतो. पण ड्रोनचा वापर करून हे टाळता येऊ शकते.

English Summary: Drone Startup: Farmers will get subsidy to buy drones! Published on: 12 April 2023, 12:46 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters