1. बातम्या

आता रंगेबिरंगी भाताची जगभरात चर्चा; अनेक आजारांवर आहे उपयुक्त

या रंगीत भाताला सध्या बाजारात चांगलीच मागणी असून बाजारातील आजचे दर हे रू.120 ते रु.350 प्रति किलो इतके आहे. शिवाय साद्या भातापेक्षा या भातातील पोषणमूल्य देखील अधिक आहेत.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
रंगीत भात

रंगीत भात

सध्या रायगड जिल्ह्यातील रंगीत भाताची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यात भातशेतीचे क्षेत्र हे जवळपास 1 लाख हेक्टर असून यातून मिळणारे दरडोई उत्पन्न वार्षिक रू.1 लाख 25 हजार इतके कमी आहे. त्यात भूधारक शेतकऱ्यांचे 87% प्रमाण तसेच 3 हजार 500 मि.मी. पाऊस आणि त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे बदल शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा दर्जा कमी करते शिवाय उत्पादनाची घट देखील होते. या परिस्थितीत रंगीत भात हे तेथील शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरलं आहे.

या रंगीत भाताला सध्या बाजारात चांगलीच मागणी असून बाजारातील आजचे दर हे रू.120 ते रु.350 प्रति किलो इतके आहे. शिवाय साद्या भातापेक्षा या भातातील पोषणमूल्य देखील अधिक आहेत. मधुमेही, हृदयरोगी, लकवा, संधीवात, सोरायसिस, उच्च रक्तदाब, कॅन्सर इ. आजार असलेल्या व्यक्ती तसेच लहान बालके, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या माता या सर्वांसाठी फायदेशीर आहेत. भात हे पीक जास्त पावसात तग धरणारे एकमेव पीक आहे. शेतकरी बंधू आपल्या उत्पादनात वाढ होण्यासाठी आणि दर्जावान पीक येण्यासाठी बरीच मेहनत घेत असतो.

रायगड जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने देखील रंगीत भात लागवड प्रायोगिक तत्वावर केली. आणि त्यात यश देखील मिळवले. या भातामध्ये Anthocyanin चे प्रमाण खूप जास्त आहे. Anthocyanin हे एक प्रकारचे Antioxidant आहे. त्यामुळे माणसाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. या भात ग्लुटेन फ्री आहे त्यामुळे वाढते वजन, मधुमेह, अल्सर व इतर अनेक आजारांमध्ये हा भात उपयुक्त आहे.

शिवाय यात प्रोटीनचे प्रमाण 4-12 % असून लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम प्रमाण अधिक आहे. साखर तसेच मेद भातामध्ये नसल्याने वजन घटविण्यासाठी हा भात चांगला उपयुक्त आहे. यावर अनेक संशोधन व चाचण्या सुरू आहेत. पूर्वी राजघराण्यात दीर्घायुषी होण्यासाठी या भाताचा वापर केला जात होता. आत्मा योजनेंतर्गत छत्तीसगड मधील आणि आपल्या राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून या भाताचे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत दिले गेले.

दक्षिण रायगड मधील तालुक्यांमध्ये रंगीत भाताचे उत्पादन चांगल्या प्रमाणात आले. तसेच काळ्या भातापेक्षा लाल भाताचे उत्पादनही चांगले दिसून आले.
मागील हंगामात भात पिकाची 91 हेक्टर क्षेत्रावर व काळा भात पिकाची 93 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती आणि त्यापासून अनुक्रमे 31 व 28 क्विंटल/ हेक्टर उत्पादन झाले. यावर्षी शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध असल्यामुळे ते वेळेत लागवड करू शकतील.

तीन शेतकऱ्यांनी कृषी पुरस्काराची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

तसेच त्यांना आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बियाणे लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यास सांगितले असल्याने खरीप 22 मध्ये शासनाच्या मदतीशिवाय जवळपास 500 हेक्टर क्षेत्रावर रंगीत भाताची लागवड होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. या भाताला शिजण्यास थोडा वेळ लागतो त्यामुळे प्रथम 4 तास भिजवून मगच नेहमीपेक्षा डबल शिट्टया देवून शिजवावा. जे एवढा वेळ नसेल तर त्यांनी भाताचे पीठ करून त्यापासून बनविलेल्या भाकरीचा समावेश आहारात करावा.

तसेच या तांदळाच्या पिठापासून डोसा, आप्पे, घावणे, उत्तपा, इडली बनविणे सहज सोपे आणि शरीराला पोषक असा आहार आहे. तसेच या भातापासून पोंगल, गोड भात, खिचडी, खीर, बिर्याणी, पुलाव, पापड, कुरडया, लाडू सुध्दा बनविता येतात. शिवाय बाजारात याचे पोहे, मुरमुरे, पिठे उपलब्ध आहेत.विशेष म्हणजे याचा वापर लहान मुलांसाठी केल्यास त्याच्या विविध रंगांमुळे व चवीमुळे निश्चितपणे त्यांना ते आवडेल.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! केंद्र सरकारची 'ही' योजना देईल शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज, वाचा सविस्तर या योजनेबद्दल
शेतकऱ्याचा नादच खुळा..! बनवला बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर; जाणून घ्या वैशिष्ट्ये

English Summary: Now the worldwide discussion of colorful rice; Useful for many ailments Published on: 09 May 2022, 10:06 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters