सध्या देशात अनेक ठिकाणी राज्यसभेचे वारे वाहत आहे. असे असताना मात्र आता निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदाच्या निवडीची घोषणा केली आहे. यामुळे आता देशाचे नवीन राष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. यामध्ये अनेक नावे सध्या पुढे येत आहेत. यामध्ये आता राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे येत आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे. विरोधी गटातून शरद पवार यांचे नाव समोर येत आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (soniya gandhi) यांनीही पवारांचे नाव सुचवले असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता शेवटी काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली असल्याची देखील माहिती समोर येत आहे. तसेच आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेऊन शरद पवार यांनी विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्हावे, अशी विनंती केली होती.
जर शरद पवार यासाठी अनुकूल असतील तर अनेक पक्ष त्यांना पाठींबा देतील. यामध्ये ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव आणि स्टॅलिन, हेमंत सोरेन यांच्यासह अनेक नेते सहज पाठिंबा देतील. काँग्रेसचा उमेदवार असेल तर काही पक्ष पाठींबा देणार नाहीत, यासाठी नवीन पर्याय काँग्रेसकडून शोधला जात आहे. तसेच शरद पवार यांना विरोधी आघाडीकडून जर उमेदवारी देण्यात आली तर या दोन्ही पक्षांसोबत संवाद साधणे आणखी सोपे होणार आहे.
शेतकऱ्यांनो विजांपासून करा तुमचे संरक्षण, दामिनी अॅपमुळे वाचणार जीव
असे असले तरी उमेदवारीसाठी उमेदवारी घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजपचे पारडे जर मानले जात आहे. यामुळे शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार (sharad pawar) यांचं नाव आजपर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनेकवेळा पुढे आलं. पण शरद पवार यांनी याबद्दल स्पष्टपणे नकार देऊन आपल्या इच्छेवर पाणी फेरलं. पण त्यांच्याच नावाची चर्चा कायम राहिली आहे.
महत्वाच्या बातम्या;
घोडगंगाचा कोजन, डिस्टलरी प्रकल्प आला नफ्यात, शेतकऱ्यांना होणार फायदा
शेतकऱ्यांनो शेळीपालनातून लाखोंची कमाई करा, कर्ज आणि सबसिडी जाणून घ्या
पाकिस्तानमध्ये वाढतेय गाढवांची संख्या, कारण ठरतंय चीन...
Share your comments