1. इतर बातम्या

लग्नावरचा खर्च कमी करा आणि शेतीत गुंतवणूक करा: शरद पवार यांचा मोलाचा सल्ला

अलीकडील काळात विवाह म्हणजे खूप खर्चिक विषय झाला असून, गोरगरीब, कष्टकरी तसेच अनेक कुटुंबांना सावकारी कर्ज काढण्याची वेळ येते.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
शरद पवार यांचा मोलाचा सल्ला

शरद पवार यांचा मोलाचा सल्ला

Hingoli : सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे विवाहावरील बराच खर्च कमी होतो. त्यामुळे खर्चाच्या बचतीची गुंतवणूक ही शेती, तसेच अन्य व्यवसायात करावी जेणेकरून नवदांपत्याच्या जीवनात बदल होईल. तसेच त्यांचा संसार सुखाचा होईल, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी एका सामूहिक विवाहात ( Community wedding ceremony) वक्तव्य केले. वाई गोरक्षनाथ ता. वसमत येथे शनिवारी आमदार राजूभय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.

यात सर्वधर्मीय १११ वधू-वरांचे विवाह उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यातील नव वधू-वरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी श्री. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाय सामाजिक न्याय व विशेष साह्यमंत्री धनंजय मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, आमदार विप्लव बाजोरीया यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

अशा शुभ वेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आपला मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अलीकडील काळात विवाह म्हणजे खूप खर्चिक विषय झाला असून, गोरगरीब, कष्टकरी तसेच अनेक कुटुंबांना सावकारी कर्ज काढण्याची वेळ येते. आमदार राजू नवघरे सेवा प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे विवाहावरील खर्च कमी होऊ लागला आहे.

सिंहावलोकन - पुस्तक प्रकाशन

वसमत येथे पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या सिंहावलोकन या पुस्तकाचे प्रकाशन माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, खासदार फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार राजु नवघरे आदींची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या:
राकेश टिकैत यांचे भारतीय किसान युनियनमधून हकालपट्टीचे खरे कारण आले समोर..
गोड बातमी : बंद पडलेल्या 11 साखर कारखान्यांना आता मिळणार नवसंजीवनी
तुम्ही तुमचा UPI पिन विसरला, काळजी करू नका; अशा प्रकारे UPI सहज बदला

English Summary: Reduce wedding expenses and invest in agriculture: Sharad Pawar's valuable advice Published on: 16 May 2022, 11:02 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters