1. बातम्या

बातमी कामाची! ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मिळणार ओळखपत्र

ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र मिळणार आहे. ऊसतोडणी कामगारांना महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाच्या स्तरावरून होणाऱ्या सामंजस्य करारानुसार मजूरी व अन्य लाभ देण्यात येत आहेत.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र

ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र

ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र मिळणार आहे. ऊसतोडणी कामगारांना महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाच्या स्तरावरून होणाऱ्या सामंजस्य करारानुसार मजूरी व अन्य लाभ देण्यात येत आहेत. असं असलं तरीही ऊसतोड कामगारांना भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, उपदान, नुकसान भरपाई, सानुग्रह उपदान इ. सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळत नाहीत.

हे लाभ मिळण्यासाठी ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्र देण्यात येत आहे. सातारा जिल्हयातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील व जे सतत मागील 3 वर्षा पासून ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांना साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व गट विकास अधिकारी यांच्या समन्वयाने सर्व्हे करून त्यांना ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र देण्यात येत आहे.


ऊसतोड कामगारांना ओळखपत्र दिल्यानंतर पुढीलप्रमाणे लाभ दिले जातात -
१. ऊसतोड कामगार यांना एक देश एक रेशनकार्ड या योजनेची अंमलबजावणी करणे, ऊसतोड कामगारांकरिता हेल्थ कॅम्प राबविणे, ऊसतोड कामगारांना पाणी पुरवठा / स्वच्छता यांची सोय करणे.

२. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शाळा सुरू करणे, ऊसतोड कामगारांचे 0 ते 6 वयोगटातील बालकास सकस अहाराची / किंवा अंगणवाडी मध्ये प्रवेश देऊन शैक्षणिक लाभ देणेची अंमलबजावणी करणे.

३. ऊसतोड महिला कामगारांसाठी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करणे, ऊसतोड कामगार यांचे मृत्युनंतर देण्यात येणारे उपदान.

वरील लाभ मिळण्यासाठी ऊसतोड कामगारच्यांकडे ओळखपत्र असणे अपेक्षित आहे. तरी सातारा जिल्हयातील ऊसतोड कामगारांनी सद्या वास्तव्यास असेलेल्या ठिकाणच्या ग्रामसेवकांशी संपर्क करून आपली नाव नोंदणी करावी असे आहवान सहायक आयुक्त, समाज कल्याण नितीन उबाळे यांनी केले आहे.


माहिती - जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara

अधिक बातम्या :
यंदा राज्यात पावसाची स्थिती काय, मान्सून कधी येणार, पंजाबराव डख यांचा पहिला अंदाज आला समोर..
राज्यात लम्पीचीही दुसरी लाट! शेतकरी चिंतेत, लसीकरण करून घेण्याचे आवाहन
कृषिपंपाच्या जोडण्या तातडीने पूर्ण करा, देवेंद्र फडणवीस यांचे आदेश..

English Summary: News work! Sugarcane workers will get identity card to avail various schemes Published on: 22 May 2023, 12:22 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters