1. कृषीपीडिया

पाणी व्यवस्थापन काळाची आणि अत्यंत महत्त्वाची गरज

आता भरपूर प्रमाणात ऊन तापत आहे भ्रमंती करणारे पशुपक्षी जंगलात पाण्याच्या शोधात असतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पाणी व्यवस्थापन काळाची आणि अत्यंत महत्त्वाची गरज

पाणी व्यवस्थापन काळाची आणि अत्यंत महत्त्वाची गरज

आता भरपूर प्रमाणात ऊन तापत आहे भ्रमंती करणारे पशुपक्षी जंगलात पाण्याच्या शोधात असतात.या सर्व गोष्टीला आपन जवाबदार आहे मला हेच सांगायचे आहे या पृथ्वीतलावर जलस्रोत फारच कमी राहीलेले आहे पण भविष्यात हे ही संपलेले तर काय होईल? सांगण्याचे तात्पर्य हेच की आज जर आपन पाणी वाचवले नाही तर उद्या पाणी आपल्याला वाचवणार नाही.जल म्हणजेच पाणी पाणी हे जीवन आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.पाणी नसेल तर ही सर्व सजीव सृष्टीही अस्तित्वात असणार नाही. सतत च्या बदलत्या हवामानाच्या स्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. हे सर्व निसर्गाने दिलेले संकेत आहे .पाणी व्यवस्थापन व नियोजन करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात जर पाणी पाहिजे असेल तर, त्याचे व्यवस्थापन व बचत करणे आवश्यक आहे . प्रत्येक व्यक्तींनी पाणी व्यवस्थापन किंवा पाणी बचत या बद्दल कार्य केले पाहिजे. 

मागील काही वर्षीत पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे आपल्या आपल्या विदर्भात काही तालुक्यांना दुष्काळाची झळ सहन करावी लागत आहे.याचा अर्थ पाण्याची परिस्थिती किती बिकट आहे हे दिसून येते,यावर मात करायची असेल तर त्या साठी जल व्यवस्थापन किंवा पाणी बचत करणं हे महत्वाचे आहे,व हे फक्त एकात्मिक जल व्यवस्थापन हे लोकचळवळी तूनच होऊ शकतं.आपला विदर्भ हा अनेक नैसर्गिक साधन संपत्तीने नटला आहे.आपल्या जिल्ह्यातील अनेक मोठया नद्या उगम पावतात.जसे की वर्धा नदी पुर्णा नदी, पेढीनदी, चंद्रभागा, सापन, शाहाणुर इत्यादी. नद्यांवरती संपुर्ण धरने उभारली गेली आहेत.पण या धरणातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन झालेले दिसून येत नाही.धरण क्षेत्रातील कृषी क्षेत्रास मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत असते .पाणी मुबलक प्रमाणत उपलब्ध असल्यामुळे तेथील शेतकरी आपल्या पिकांना पाण्याचे योग्य व्यवस्थापन न करता पाणी देत असतात. शेतकरी हा पाणी मोकाट पद्धतीने पाणी देत असतो ,या पद्धतीने पाणी देण्याचे कोणतेही व्यवस्थापन अवगत नाही. तेथील शेतकऱ्यांन पिकासाठी ठिबक सिंचनचा वापर केल्यास पाण्याचे योग्यरित्या व्यवस्थापन होऊ शकते.शेतीमध्ये पुढील पद्धतीने पाणी व्यवस्थान होऊ शकते

कृषी क्षेत्रात ठिबक सिंचनचा वापर वाढवणे.तुषार सिंचन पद्धतीचा वापर करणे.पाणी मोकाट पद्धतीने देत असतांना सरी वरंबा व सारा पद्धतीचा वापर करावा.पिकास जेवढ्या पाण्याची गरज आहे, तेवढेच पाणी द्यावे.धरणांच्या लाभक्षेत्रात कालव्यांद्वारे पाणी न देता ते बंदिस्त नळीपाईप द्वारे पाण्याचे वितरण करावे.

पाण्याचासाठा वाढवण्यासाठी धरणातील गाळ काढण्यास महत्व द्यावे.अनियमित पर्जन्यमान व जमिनीतील खालावणारी पाणीपातळी ही भविष्यातील संकटाची चाहूल आहे. पाण्याचे महत्त्व ओळखण्याची हीच वेळ आहे. पावसाचा थेंब अन् थेंब अडविणे हीच काळाची गरज आहे.पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अडविण्याचा एकत्रित प्रयत्न करण्याचीआपली जबाबदारी आहे. शेती व मानवी जीवनात पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पाणी बचत व जलसंवर्धन करण्याच्या कामात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे.भविष्यातील पाणी संकटातून मार्ग काढण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक बनले आहे.

जंगले नष्ट केल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. वातावरणात उष्णता वाढल्याने पावसाचे चक्र बदललेले वृक्षतोड केल्याने जमिनीतील जलस्त्रोत आटले आहेत, तसेच आज मोठ्या प्रमाणावर माणसाकडून पाण्याचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे आज पाण्याची कमतरता भासत आहे. नद्या, नाले, सरोवरे हे गाळाने भरल्यामुळे झर्‍यांची मुख बंद झालेआहेत. 

आज पाणी वाचवायचे असेल तर नदी, नाले, सरोवरे तसेच डोंगर दर्‍यांतील झरे येथील गाळ काढणे आवश्यक आहे. झर्‍यांची मुखे उघडी राहिली तरच पाण्याची पातळी वाढेल. याबरोबरच जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी, जेणे करून पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन पूर्ववत होण्यास मदत होईल.

जंगल संपत्ती टिकवून ठेवून शक्य असेल तेथे वृक्ष लागवड केली, तर सावलीने पाण्याचे बाष्पीभवन तर कमी होईलच, पण पाऊस भरपूर व नियमित पडेल. वृक्षांची मुळे माती धरून ठेवतात. जमिनीची धूप त्यामुळे होणार नाही व झरे निर्माण होऊन ते जिवंत व प्रवाही राहतील. आज जर ही अवस्था आहे, तर आणखी काही वर्षांनी येणार्‍या पिढीसाठी पाण्याची ही समस्या किती तीव्र बनेल याचा अंतर्मुख होऊन विचार करून पाण्याचा अपव्यय न करता ते जपून वापरणे महत्त्वाचे आहे.

 

श्री राजेश राठोड सर विषय विशेषज्ञ (कृषी व अभियांत्रिकी), कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती1यांच्या द्वारा मार्गदर्शन

माहिती संकलन- मिलिंद जि गोदे

Save the soil all together

Save water save soil

English Summary: Water management is today's and important need Published on: 23 April 2022, 11:57 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters