1. कृषीपीडिया

ऊसतोडणी यंत्राला मोठी मागणी; शेतकऱ्यांचा कल ऊसतोडणी यंत्राकडे..

राज्यात सुमारे 600 हून अधिक ऊसतोडणी यंत्र (Sugar cane harvester) विविध कारखान्यांसाठी ऊसतोडणी करत आहेत. प्रत्येक वर्षी तोडणी यंत्रातील त्रुटी (Machine error) दूर करत अनेक कंपन्यांनी गेल्या दहा वर्षांत यंत्रे (machines) बाजारात आणली.

sugar cane harvesters

sugar cane harvesters

राज्यात सुमारे 600 हून अधिक ऊसतोडणी यंत्र (Sugar cane harvester) विविध कारखान्यांसाठी ऊसतोडणी करत आहेत. प्रत्येक वर्षी तोडणी यंत्रातील त्रुटी (Machine error) दूर करत अनेक कंपन्यांनी गेल्या दहा वर्षांत यंत्रे (machines) बाजारात आणली. उसाची उपलब्धता कमी जास्त असल्याने यंत्राच्या मागणीत सातत्य राहिले नाही.

मागच्या हंगामात मराठवाड्याला मोठा फटका बसला होता. ऊसतोडणी आवरत नसल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांनी आपली ऊसतोडणी यंत्रे मराठवाड्यात पाठवून हंगाम संपवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे यंदा ऊसतोडणी यंत्राला मोठी मागणी आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी यंत्राच्या मदतीने ऊस तोडणी करत आहेत.

PM Suraksha Bima Yojana: महिन्याला फक्त 1 रुपया जमा करा; सरकार देतंय 2 लाखांचा लाभ

उस तोंडणी यंत्रामुळे बऱ्याच ठिकाणी ऊसतोडणी चांगल्या प्रकारे झाली. हा अनुभव लक्षात घेऊन आता मराठवाड्यातील लातूर, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून प्रामुख्याने ऊसतोडणी यंत्राची चौकशी कंपन्यांकडे होत आहे. यावरून शेतकऱ्यांचा कल ऊसतोडणी यंत्राकडे दिसून येत आहेत.

Agricultural Business: शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात शेतीच्या बांधावर लावा 'ही' झाडे; मिळेल भरघोस उत्पन्न

साधारणतः सव्वा कोटी रुपयांपर्यंत ऊसतोडणी यंत्राच्या किमती असतात. अनुदान (grant) नसल्याने काही शेतकरी एकत्र येऊन ही ऊसतोडणी यंत्रे (sugarcane cutting) खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. ज्या भागात उसाचे क्षेत्र जास्त आहे, त्या भागात यंत्राने तोडणी सुलभ होत आहे. त्यामुळे कारखान्यांनी यंत्राला पसंती दिल्याचे चित्र आहे.

महत्वाच्या बातम्या
Horoscope: तुमचा आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या राशिभविष्य
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; खाद्य तेल होणार स्वस्त, जाणून घ्या आजच्या किमती
MSEDCL: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्यात 24 तास वीज पुरवठा होणार, जाणून घ्या

English Summary: sugar cane harvesters Farmers tend towards sugarcane harvester Published on: 05 August 2022, 01:12 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters