केंद्र शासनाने अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व त्यातून त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यास सुरुवात केली होती. या योजनेतून जवळजवळ साडेबारा कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ होतो आहे.
या योजनेचा आता अकरावा हफ्ता येणार आहे. सध्या या अकराव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र एप्रिल ते जुलै दरम्यान अकरावा हप्ता खात्यात जमा होणे अपेक्षित आहे.
अशातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या संबंधित एक बातमी समोर आली आहे. या योजनेसाठी अपात्र असलेले लोकदेखील या सन्मान निधीचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेतलेल्या सर्वांची पडताळणी केली जाणार असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे.
कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी यांच्या निर्देशानुसार १ मे ते ३० जून दरम्यान सोशल ऑडिट (Social Audit) करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र आणि अपात्र लोकांची माहिती गोळा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्या यादीच्या साहाय्याने अपात्र असलेल्यांची नावे यादीमधून काढून टाकली जातील आणि पात्र लोकांची नावे जोडली जातील.
तसेच एकाच घरातून दुहेरी लाभ घेणाऱ्यांची नावे व मृत व्यक्तींची नवे या यादीतून वगळली जाणार असल्यास समोर येत आहे. तसेच या प्रकल्पात सोशल ऑडिट करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो विक्रेत्यांनी खताचा साठा केल्यास माहिती द्या, साठा आढळल्यास जिल्हाधिकारी कारवाई करणार..
अवकाळी पावसाचा धुमाकूळ; वीज कोसळून तीन गायींचा बळी
माळवाडीच्या शेतकऱ्याची परदेशी पाहुण्याला भुरळ, शेती बघण्यासाठी परदेशी पाहुणे माळवाडीच्या शिवारात
Share your comments