1. बातम्या

कधी नव्हे ते पुणे जिल्हात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी, काय आहेत कारणे, वाचा...

सध्या सोयाबीन पीक राज्यातील विविध जिल्ह्यात घेतले जात आहे. अशातच पुणे जिल्हा सोयाबीन उत्पादनाचे आगर बनू पाहात आहे. यंदा पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात सोयाबीन पीक घेतले गेले आहे.

sowing of soybean in Pune district

sowing of soybean in Pune district

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने सोयाबीन शेती केली जाते. मात्र सध्या सोयाबीन पीक राज्यातील विविध जिल्ह्यात घेतले जात आहे. अशातच पुणे जिल्हा सोयाबीन उत्पादनाचे आगर बनू पाहात आहे. यंदा पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात सोयाबीन पीक घेतले गेले आहे. यावर काही महिन्यांचे दुबार पीक घेऊन आता पुन्हा उन्हाळी सोयाबीन पेरणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असून जवळपास २०० हुन अधिक हेक्टरमध्ये सोयाबीन पेरणी झाली आहे.

त्यामुळे पुणे जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुणे जिल्ह्यात जमिनीची सुपीकता वाढावी या भावनेने सुरवातीला काही वर्षांपासून सोयाबीन पीक अंशतः घेतले जात होते. मात्र कमी-जास्त पावसाच्या परिस्थितीत देखील सोयाबीन पीक खात्रीशीर उप्तादन देऊ लागल्याने अनेक शेतकरी सोयाबीन शेती करू लागले आहेत.

तर यंदा सोयाबीन काढून झाल्यावर आलेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतातच सडून गेल्याने नुकसान झाले. यावर कृषी विभागाने उन्हाळ्यात सोयाबीन बिजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला असून शेतकऱ्यांनी फेब्रुवारीपासून तयारी सुरू करत उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला असून जवळपास १ हजार १८९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात ८५६ हेक्टरवर, तर नगर जिल्ह्यात १७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा सोयाबीन भरघोस प्रमाणात उपलब्ध होणार आहे. नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून अल्प प्रतिसाद असला तरी नगरमध्ये १२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पुणे जिल्ह्यात बारामतीत जवळपास ५५६ हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली. याशिवाय ऐन उन्हाळ्यात पाणी कमी पडणाऱ्या जुन्नर तालुक्याने देखील २४० हेक्टरवर पेरणी केली आहे.

तसेच खेड, हवेली, मुळशी, भोर, मावळ, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, दौंड या तालुक्यातही समाधानकारक पेरणी झाली आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात याचे दर कसे राहतील, याचा अंदाज लावले अवघड जाणार आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली, असे असताना आता पुणे जिल्हा लागवडीत आघाडीवर गेला आहे.

महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! PM kisan Yojna; पीएम किसान योजनेत मोठा बदल, शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
महागाईचा भडका! आता गँस, पेट्रोल, डिझेलनंतर ८०० औषधांचे दर वाढणार
जमिनीची मशागत नांगरट कशी करायची, वाचा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा महत्वाचा सल्ला..

English Summary: Never so much sowing of soybean in Pune district, what are the reasons, read ... Published on: 26 March 2022, 02:58 IST

Like this article?

Hey! I am मनोज रामचंद्र दातखिळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters