1. कृषीपीडिया

जाणून घ्या सोयाबीन पिकाचे काही अद्यावत वाण अन् त्यांची वैशिष्ट्ये

KJ Maharashtra
KJ Maharashtra
soyabean varieties

soyabean varieties

सोयाबनीची लागवड विदर्भ, मराठवाड्यात अधिक प्रमाणात केली जाते. या पिकांची काही वाण आहेत, जे आपले उत्पन्न वाढविण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आपण त्यांची माहिती या लेखात घेणार आहोत.

जेएस 335 हे सोयाबीनचे वान मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी स्वीकारलेलं वाण आहे. आहे. साधारणत: 98 ते 102 दिवसात परिपक्व होणारे जांभळ्या रंगाची फुले असणार साधारणता तेलाचे प्रमाण 18 ते साडे 18.5 टक्के असणार व हेक्टरी हेक्टरी 22 ते 24 क्विंटल उत्पादन देणारे हे वाण 1993 प्रसारित झालेल वाण आहे. सर्व दृष्टीने योग्य असणार हे वाण दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या शेतावर कमी उत्पादन देत असल्याबद्दल शेतकरी बंधू सांगतात तसेच नवीन गुणवैशिष्ट्ये असणाऱ्या सोयाबीनच्या वाणाबद्दल विचारणा करतात. शेतकरी बंधूंनो जेएस 335 या सोयाबीनच्या वाणाचे बियाणे घरीच तयार करून त्याची अंकुरंन क्षमता तपासून घरचे बियाणे वापरून पेरणी करा.

हेही वाचा : रब्बी हंगामातील पिकाच्या काढणीनंतर मूग व उडीदाची लागवड आहे फायदेशीर

तसेच खालील अद्यावत वाणांच्या संदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणात त्यांच्यामध्ये असलेली विविध गुणवैशिष्ट्ये आपली स्वतःची गरज ओळखून संबंधित भागा करिता संबंधित कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेले नवीन शिफारशीत वाणाचे प्रमाणित बियाणे विरजण म्हणून आस्वतः हे नवीन अद्यावत वाण आपल्या शेतावर कशाप्रकारे उत्पादन देतात या आधारावर स्वतः घरचे बी तयार करून पुढच्या हंगामात मागील हंगामातील चांगल्या अनुभवाच्या आधारावर त्यांचा पेरा वाढवा फार मोठ्या प्रमाणात नवीन अद्यावत वाणाच्या बॅग विकत घेऊन उत्पादन खर्च सुद्धा वाढवू नका तसेच स्वतः एकदा त्याचे चांगले उत्पादन आले तर हेच बी पुढच्या हंगामात पेरा व इतर शेतकऱ्यांना सुद्धा गरजेनुसार खुले सोयाबीन बी त्यांच्या इच्छेनुसार आपण त्यांना देऊ शकता.

आता आपण सोयाबीनचे काही अद्यावत वाण व त्यांची गुणवैशिष्ट्ये याची माहिती घेऊया.

(१) जे एस 93 -05 : हे सोयाबीनचे वाण कमी कालावधीत परिपक्व होणारे असून या वाणाचा फुलावर येण्याचा कालावधी 35 ते 37 दिवस असून परिपक्वता कालावधी 90 ते 95 दिवस एवढा आहे. फुलाचा रंग जांभळा असून 100 दाण्यांचे वजन 11 ते 12 ग्रॅम असत. या वाणात तेलाचा उतारा 18 ते 19 टक्के असून हेक्टरी उत्पादकता ते 20 ते 24 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी आहे. तुलनात्मकदृष्ट्या हा वाण कीड रोग प्रतिकारक्षम आहे.

(२) जे एस 95 - 60 : हा सोयाबीन चा जांभळ्या रंगाची फुले असणारा वान कमी कालावधीत परिपक्व होणारा असून साधारणता 32 ते 34 दिवसात फुलात येतो व 82 ते 88 दिवसात परिपक्व होतो. या वाणाच्या 100 दाण्याचे वजन 12 ते 13 ग्रॅम असून तेलाचा उतारा 18.5 ते 19 टक्के एवढा तर हेक्टरी उत्पादकता 18 ते 20 क्विंटल प्रति प्रति हेक्टर एवढी आहे.

(३) एम ए यु एस - 158 : हा सोयाबीन चा जांभळी फुलं असणारा वाण साधारणत 38 ते 42 दिवसात फुलात येतो व 95 ते 98 दिवसात परिपक्व होतो. या या वाणाचे 100 दाण्याचे वजन दहा ते बारा ग्रॅम एवढे असून तेलाचा उतारा 19 ते 19.5 टक्के तर हेक्टरी उत्पादकता 26 ते 31 क्विंटल पर्यंत येऊ शकते. तुलनात्मक दृष्ट्या या या वानाचा दाना टपोरा असून शेंगा पक्व झाल्यानंतर दहा ते बारा दिवस या वाणाच्या शेंगा फुटत नाही. हां वाण खोडमाशी साठी सहनशील व आंतर पिकासाठी योग्य आहे.

 

(४) एम ए यु एस - 162 : शेतकरी बंधुंनो सोयाबीनचा जांभळी फुले असणारा वाण 41 ते 44 दिवसात फुलावर येतो तर शंभर ते एकशे तीन दिवसात परिपक्व होतो. या सोयाबीनच्या कोणाचे 100 दाण्याचे वजन अकरा ते तेरा ग्राम एवढे असून तेलाचा उतारा 19.5 20 टक्के एवढा असतो व हेक्टरी उत्पादकता ते 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी आहे. शेतकरी बंधुंनो या वानाला शेंगा झाडाला जमिनीपासून तुलनात्मक दृष्ट्या अधिक उंचीवर लागत असल्यामुळे हा वाण यंत्राद्वारे काढणीसाठी म्हणजेच मेकॅनिकल हार्वेस्टिंग साठी उत्तम आहे तसेच या वाणाच्या शेंगा परिपक्वते नंतर दहा ते बारा दिवस फुटत नाहीत.

(५) एम ए यु एस 612 : हे सोयाबीन वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी प्रसारित केलेले असून या वानाचा परिपक्वता कालावधी 93 ते 98 दिवस असून हा वाण कमी ओलाव्यास व शेंगा तडकणे संदर्भात सहनशील म्हणून शिफारशीत आहे. सोयाबीन वरील विविध रोग व किडीसाठी सुद्धा तुलनात्मकदृष्ट्या प्रतिकारक्षम म्हणून हा वाण शिफारशीत असून मशीन द्वारे काढणीसाठी योग्य आहे.

(६) ए एम एस - 1001 ( पीडीकेव्‍ही येलो गोल्ड) : डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी 2018 साली प्रसारित केलेला जांभळ्या रंगाची फुले असलेला 38 ते 40 दिवसात फुलात येणार व 95 ते 100 दिवसात परिपक्व होणारा तसेच हेक्टरी 22 ते 26 क्विंटल उत्पादकता देणारा हा वाण असून तेलाचा उतारा या या वनात 19 ते 19.5 टक्के एवढा असतो तर 100 दाण्याचे वजन 10.5 ते अकरा ग्रॅम एवढे असते.

(७) एएमएस एमबी -5 -18 ( सुवर्ण सोया ) : हा वाण 2019 या वर्षात प्रसारित केलेला असून या सोयाबीनच्या वाणाचा फुलाचा रंग पांढरा असून या वाहनाचा फुलात येण्याचा कालावधी 40 ते 42 दिवस व परिपक्वता कालावधी 98 ते 102 दिवस आहे या वाणाचे 100 दाण्याचे वजन दहा ते अकरा ग्रॅम तेलाचा उतारा 19.5 ते ते 20 टक्के एवढा आहे तर हेक्टरी उत्पादकता ते 28 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी मिळू शकते.

(८) फुले संगम (के डी एस 726) : हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2016 ला दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू या भागाकरिता शिफारशीत केलेला सोयाबीनचा वान आहे. हा वाण तांबेरा रोगास कमी बळी पडणारा वाण म्हणून शिफारशीत असून या वाणाचा परिपक्वता कालावधी 100 ते 105 दिवस आहे. हा वाण पानावरील ठिपके आणि खोडमाशी सुद्धा तुलनात्मक दृष्ट्या प्रतिकारक असून या वाणाची हेक्टरी उत्पादकता 23 ते 25 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली असून या वानाचा तेलाचा उतारा 18. 42 टक्के एवढा आहे.

 

(९) फुले किमया (के डी एस 753) : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा वाण सन 2017 ला दक्षिण महाराष्ट्र, तेलंगाना, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व इतर काही राज्याकरिता शिफारशीत केला असून या वाणाचा परिपक्वता कालावधी 95 ते 100 दिवस असून हा वाण तांबेरा रोगास कमी बळी पडतो म्हणून शिफारशीत आहे. या वानात तेलाचा उतारा 18.25 % एवढा असून या वाणाची हेक्टरी उत्पादकता 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली आहे.

(१०) सोयाबीन के. एस. 103 : शेतकरी बंधूंनो हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2018साली दक्षिण महाराष्ट्र, तेलंगाना तामिळनाडू आंध्र प्रदेश व इतर काही राज्यासाठी प्रसारित केला असून या वाणाचा परिपक्वता कालावधी 95 ते 100 दिवस एवढा आहे. हा वाण तांबेरा रोगास व व सोयाबीन वरील विविध कीड व रोगास तुलनात्मक दृष्ट्या प्रतिकारक असून रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देणारा न लोळणारा म्हणून त्याची गुणवैशिष्ट्ये नमूद केली आहे. या वाणाची हेक्टरी उत्पादकता 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली असून तेलाचा उतारा जवळपास 18.10 टक्के एवढा असतो.


वर निर्देशित वाणाचे बियाणे उपलब्धते संदर्भात कुणाकडे विचारणा करू शकता?
 वर निर्देशित वाणाचे बियाणे उपलब्धते संदर्भात संबंधित कृषी विद्यापीठे, ,शेतकऱ्यांच्या बियाणे उत्पादक कंपन्या, महाबीज किंवा शासन मान्यताप्राप्त इतर कंपन्या यांच्याकडे त्यांचे निर्देशीत कालावधीमध्ये विचारणा करू शकता अर्थात यासंदर्भात अधिक माहिती संबंधितांकडूनच प्राप्त होऊ शकेल

नवीन वाण वापरण्या संदर्भात घ्यावयाची विशेष काळजी व सल्ला.

(१) शेतकरी बंधुंनो वर निर्देशित सोयाबीनच्या काही वाना संदर्भात आपणास सर्व साधारण कल्पना यावी यासाठी वर निर्देशित संकलित माहिती दिली असली तरीही आपल्या स्थानिक कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे आपल्या संबंधित भागाकरिता शिफारशीत वानाचाच प्रत्यक्ष तज्ञाचा सल्ला घेऊन अंगीकार करावा व सुरुवातीला छोट्या प्रमाणात विरजण म्हणून नवीन अद्यावत वाण आपले स्वतःचे शेतावर घेऊन त्याचा स्वतःचा अनुभव लक्षात घेऊन स्वतः घरचे बियाणे तयार करून पुढील हंगामात मोठ्या प्रमाणात आपल्या स्वतःच्या अनुभवावर नवीन वानाचा मोठ्याप्रमाणात पेरा वाढविणे केव्हाही हितावह व योग्य असते.

(२) शेतकरी बंधुंनो वर निर्देशित वाण पेरून हमखास जास्तीत जास्त उत्पादन घ्या असा संदेश घेऊ नका कृपया आपले परंपरागत जे एस 335 या वाना बरोबर या व इतर शिफारशीत अद्यावत वानाचे प्रमाणित बियाणे थोड्या प्रमाणात विरजण म्हणून आणून पेरा व पुढच्या वर्षी स्वतः घरच्या पेरणीकरिता घरचे घरी बी तयार करून आपले स्वतःचे शेतातील अनुभवावर आधारित पुढच्या वर्षी या वानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करू शकता व ज्या वानाचा अनुभव चांगला वाटला नाही ते वाण घेणे भविष्यात टाळा.

(३) शेतकरी बंधूंनो नवीन वाण प्रसारित करताना शास्त्रज्ञ अनेक चांगले गुणधर्म घेऊन नवीन वाण प्रसारित करतात परंतु स्थानिक हवामान व इतर पिकाच्या उत्पादनावर परिणाम करणारे अनेक घटक हे पिकाच्या उत्पादकतेस कारणीभूत ठरत असतात त्यामुळे केवळ नवीन वाण पेरले हमखास उत्पादन वाढते हा समज दूर करा व सर्व पिकाकरिता एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अंगीकार करून त्यात अद्यावत वाण या या घटकाचा अंतर्भाव करून पिकाची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवा

लेखक - राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

प्रतिनिधी - गोपाल उगले

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters