नाशिक शहरातील शेतकरी संतोष सोनवणे यांनीही शेतीला जोड धंदा म्हणून मत्स्यपालन व्यवसाय ( Fish ) सुरू केला. आहे. या व्यवसाय करून त्यांनी एक उत्तम उदाहरण दिले आहे. यामधून त्यांना चांगले पैसे मिळत आहे. नाशिक शहरातील शेतकरी संतोष सोनवणे यांनी बायोफ्लॉक इस्राईल पद्धतीने मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आहे.
सध्या शेतीसोबतच शेती पूरक व्यवसाय करण्याकडे अनेकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. शेतीचे सध्याचे बाजारभाव कमीजास्त होत आहेत. यामुळे शेतकरी इतर व्यवसाय करत आहेत. शेतीपूरक व्यवसायातून ( Farmer ) लाखों रुपये उत्पन्न देखील शेतकऱ्यांना ( Farmers ) मिळत आहे. संतोष सोनवणे यांनीही शेतीला जोड धंदा म्हणून मत्स्यपालनव्यवसाय ( Fish ) सुरू केला असून यामधून त्यांना चांगली कमाई सुद्धा होत आहे.
त्यांनी याबाबत प्रशिक्षण घेतलं त्यांनी मत्स्यपालन व्यवसाय आपल्या शेतात सुरू केला आहे. या मत्स्यपालन व्यवसायातून त्यांना सहा महिन्याला तीन ते साडेतीन लाख रुपये मिळतात. यामुळे इतर शेतकऱ्यांपुढे त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. संतोष सोनवणे यांनी शेतात पाच आधुनिक टँक तयार केले आहेत. ते पूर्णतः इस्राईल टेक्नॉलॉजीचे आहेत.
अमूल, मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची केली वाढ..
इस्राईल टेक्नॉलॉजीमुळे त्यांना जास्त जागा लागत नाही. सहा महिन्यांनी त्यांची एक बॅच विक्री होते. लो व्हॅल्यू फिश, हाय व्हॅल्यू फिश, त्यातील तीलापे, रूपचंदा या प्रजातींचे मासे चांगले असतात. यामुळे लकरात लवकर त्यांची विक्री होते. तसेच एक व्यक्ती दहा टँक सांभाळू शकतो. त्याला जास्त कामगारांची गरज नसते. यामुळे खर्च देखील जास्त नसतो.
आता होणार राडा! रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये येणार..
माशांना ऑक्सिजन देणे त्यांना खाणे देणे हे काम टॅंकमध्ये असल्याने सोपे जाते. यासाठी सात ते आठ लाखांच्या गुंतवणुकीतून सहा महिन्याला तीन ते साडेतीन लाख रुपये मिळतात. यामुळे हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. थोडा खर्च सुरुवातीला केल्यास नंतर जास्त खर्च करावा लागत नाही.
महत्वाच्या बातम्या;
Farming Technique: आता करा जमिनीखाली आणि जमिनीवर दुहेरी शेती, ही पद्धत अवलंबल्यास मिळेल बक्कळ पैसा..
मोदी सरकारची मोठी घोषणा! आता कृषी कर्जावरील व्याजात मिळणार मोठी सूट
काय ते कार्यकर्त्यांवरच प्रेम!! उदयनराजेंचा नादच खुळा, कार्यकर्त्याला तोंडाने भरवला पेढा..
Share your comments