1. ऑटोमोबाईल

आता होणार राडा! रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये येणार..

आपल्याकडे बुलेटची एक वेगळीच हवा आहे. या गाडीवर बसले की एक वेगळाच फील येतो. रॉयल एनफिल्ड बाईकची मागणी भारतीय बाजारपेठेत कायम आहे, तसेच कंपनी देखील वेगाने आपली श्रेणी वाढवत आहे. हे पाहता हंटर 350 नंतर आता नवीन जनरेशन बुलेट 350 देखील बाजारात आणणार असल्याची बातमी समोर येत आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Royal Enfield electric bike

Royal Enfield electric bike

आपल्याकडे बुलेटची एक वेगळीच हवा आहे. या गाडीवर बसले की एक वेगळाच फील येतो. रॉयल एनफिल्ड बाईकची मागणी भारतीय बाजारपेठेत कायम आहे, तसेच कंपनी देखील वेगाने आपली श्रेणी वाढवत आहे. हे पाहता हंटर 350 नंतर आता नवीन जनरेशन बुलेट 350 देखील बाजारात आणणार असल्याची बातमी समोर येत आहे.

क्रूझ बाईक निर्माता रॉयल एनफिल्ड देखील आता इलेक्ट्रिक बाईक बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशातील इलेक्ट्रिक बाईकची वाढती मागणी पाहता रॉयल एनफिल्डने इलेक्ट्रिक क्रूझ बाईक बनवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे. अशी चर्चा आहे की रॉयल एनफिल्ड आपली इलेक्ट्रिक बुलेट बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च करू शकते.

Royal Enfield आणि Volvo Eicher Commercial Vehicles (VECV) यावर्षी 1,000-1,100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत, ज्यापैकी फक्त रॉयल एनफिल्ड 500-600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रॉयल एनफिल्ड आपली क्षमता, उत्पादने आणि प्रकारांमध्ये संतुलन राखण्यासाठी पैसे खर्च करेल. रॉयल एनफिल्ड परदेशातील बाजारपेठांमध्ये आपला व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत आहे आणि शून्य कार्बन उत्सर्जन वाहनांवर लक्ष केंद्रित करत आहे.

तुमच्या कारमधील एअरबॅगची किंमत किती माहितेय? नितीन गडकरींचे उत्तर सांगून तुम्हाला धक्काच बसेल

रिपोर्टनुसार, आयशर मोटर्सचे सीईओ सिद्धार्थ लाल यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांसाठी इंजिनीअरिंगचे काम सुरू आहे. रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाइक: कंपनी सध्या तिच्या इलेक्ट्रिक बाइकवर काम करत आहे. त्यासाठी मोठी गुंतवणूकही केली जाणार आहे. पण रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाइक तुम्हाला सध्या बाजारात पाहायला मिळणार नाही, कारण ती तयार व्हायला वेळ लागेल.

कंपनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. रॉयल एनफिल्ड शक्तिशाली आणि क्रूझ बाइक्ससाठी ओळखली जाते. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक क्रूझ बाईकमध्ये पेट्रोल बुलेटसारखी शक्ती कशी आणता येईल यावर काम सुरू आहे. रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाईक बाजारात येण्यासाठी 2 ते 4 वर्षे वाट पाहावी लागेल असा अंदाज आहे.

आता मर्सिडीज लॉंच करणार इलेक्ट्रिक कार, मार्केटमध्ये होणार धुमाकूळ..

Hero Motocorp आणि Harley Davidson यांनी संयुक्तपणे त्यांची नवीन बाईक भारतात लॉन्च केली आहे. Harley Davidson Nightster नावाच्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आहे. या बाईकची बुकिंगही सुरू झाली आहे. यामुळे आता या गाडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
अमूल, मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची केली वाढ..
फक्त हर घर तिरंगा म्हणायचं का? रात्र झाली तरी तहसील कार्यलयावरील राष्ट्रध्वज तसाच, राज्यात खळबळ..
सेकंड हॅन्ड कार घेताय? एका रुपयात जाणून घ्या कारच्या टायरची स्थिती...

English Summary: Royal Enfield electric bike will come in the market.. Published on: 16 August 2022, 06:22 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters