1. बातम्या

गायीच्या शेणापासून कमवा भरपूर पैसे

व्यवसाय करण्याच्या बाबतीत बर्‍याच जणांच्या डोक्यामध्ये वेगळ्या प्रकारचा संकल्पना असतात. काहीजण जगावेगळे व्यवसाय शोधून त्या व्यवसायामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
lot of money

lot of money

व्यवसाय करण्याच्या बाबतीत बर्‍याच जणांच्या डोक्यामध्ये वेगळ्या प्रकारचा संकल्पना असतात. काहीजण जगावेगळे व्यवसाय शोधून त्या व्यवसायामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात. परंतु या सगळ्या व्यवसाय शोधणाऱ्या लोकांच्या डोक्यात अशा व्यवसायांची शोध मोहीम असते की ज्या व्यवसायात कमीत कमी भांडवल लागेल आणि जास्तीचा नफा मिळेल आणि वरून सरकारी अनुदानाचा फायदा मिळाला तर उत्तमच म्हणून आम्ही या लेखामध्ये अशाच एका व्यवसायाविषयी माहिती देणार आहोत. ते म्हणजे गायीच्या शेनापासून तुम्ही चांगल्या प्रकारची कमी करू शकतात.

गायीच्या शेणापासून चांगली कमाई:

आपल्याला माहिती आहे की गाईचे शेण अनेक बाबतीत उपयुक्त आहे. त्याच्या या उपयुक्त गुणांचा फायदा करून घेतला तर  चांगल्या प्रकारच्या उत्पन्न मिळू शकते. गायीच्या शेणापासून कागद, पेंट ही बनवले जाते. खादी ग्रामोद्योग विभागाने गायीच्या शेणापासून वैदिक पेंट बनवले जाते.

गायीच्या शेनापासून कागदाचा व्यवसाय:

गाईच्या शेणापासून कागदनिर्मिती चा तुम्ही सुरू करू शकता. शेणापासून कागदनिर्मिती चा प्रयोग यशस्वी झाला आहे. शेणापासून कागद बनविण्यासाठी कागदाच्या तुकड्यांचा वापर केला जातो. नॅशनल हॅन्डमेड पेपर इन्स्टिट्यूटमध्ये गाईच्या शेणापासून कागदनिर्मितीची पद्धत शोधून काढण्यात आली आहे. गायीच्या शेणापासून हॅन्डमेड पेपर तयार केला जातो. या तयार झालेल्या कागदाचा दर्जा ही उत्तम असतो. गायीच्या शेनापासून कॅरी बॅग ही तयार केली जाते.

हेही वाचा:Small Business Ideas : बक्कळ नफा देणारे कमी गुंतवणुकीतील व्यवसाय; कमाई करा हजारो रुपयांची

कागद निर्मिती साठी अनुदान:

शेणापासून कागद निर्मितीचे व्यवसायाला सरकारकडून कर्ज आणि अनुदान उपलब्ध केले जाते. तुम्हाला जर हा व्यवसाय उभारायचा असेल तर तुम्ही ५ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत व्यवसाय उभारू शकतात. आपले स्थापन करण्यासाठी जवळ १५ लाख रुपये खर्च येऊ शकतो. ह्या प्लांट मधून महिनाभरात जवळजवळ १ लाख पेपर बॅग तयार करता येतात.

 व्हेजिटेबल डायचा व्यवसाय:

आपण शेणापासून व्हेजिटेबल डाय बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता म्हणजेच आपण कागद आणि भाज्यांचा रंगाचा व्यवसाय सहजपणे सुरू करू शकता. कागद निर्मिती मध्ये शेणामधील ७ टक्के घटक वापरले जातात. उरलेले ९३% घटक भाज्यांचा डाय करण्यासाठी वापरला जातो.

शेनापासून कंपोस्ट खत निर्मिती:

सध्या सेंद्रिय शेतीचा प्रयोग वाढताना दिसत आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन म्हणून शासन विविध प्रकारची मदत करतो. सेंद्रिय शेती करण्यासाठी शेणखत लागतेच लागते. आपण सेनापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा व्यवसाय देखील करू शकतो.

रंग निर्मिती:

गायीच्या शेणापासून तुम्ही रंग सुद्धा बनवू शकता. गायीच्या शेणापासून तयार रंग डिस्टेंपर आणि इमल्शनमध्ये येत असल्याने हा पेंट इको फ्रेंडली, बिनविषारी, एंटी फंगल आणि धुता येण्यासारखा असल्याने तो अवघ्या काही तासात कोरडा होतो.

English Summary: Make a lot of money from cow dung Published on: 13 January 2021, 03:03 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters