1. बातम्या

Small Business Ideas : बक्कळ नफा देणारे कमी गुंतवणुकीतील व्यवसाय; कमाई करा हजारो रुपयांची

आपण जर शहारजवळ राहत असाल आणि आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खुप फायद्याचा आहे. अगदी कमी गुंतवणुकीत बक्कळ नफा देणाऱ्या व्यवसायाविषयी आम्ही आपल्याला माहिती देत आहोत. आपण या small बिझनेसमधून आपली प्रगती करु शकता. यातील पहिला व्यवसाय आहे, ब्युटी पार्लर.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


आपण जर शहारजवळ राहत असाल आणि आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खुप फायद्याचा आहे. अगदी कमी गुंतवणुकीत बक्कळ नफा देणाऱ्या व्यवसायाविषयी आम्ही आपल्याला माहिती देत आहोत. आपण या small बिझनेसमधून आपली प्रगती करु शकता. यातील पहिला व्यवसाय आहे.

ब्युटी पार्लर ( BEAUTY PARLOUR BUSINESS)

कमी गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या व्यवसायात ब्युटी पॉलर हे पहिल्या नंबरवर आहे. हा व्यवसाय सर्व हंगामात चालणारा आहे. या व्यवसायातून आपण चांगला नफा कमावू शकतो. महिला असो किंवा पुरुष दोघेही हा व्यवसाय करु शकतात. छोट्याशा दुकानात आपण हेअर डिझाईन आणि फेसवॉश किंवा हेअर स्पा करुन दमदार कमाई करु शकतात. या व्यवसायासाठी आपल्याला २० हजार ते ७ लाखापर्यंतची गुंतवणूक करावी लागते. जर मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करायचा असेल तर १० लाख रुपयाचा खर्च व्यवसाय सुरू करण्यास लागतो.

 

Computer Repairing (लॅपटॉप आणि कॉम्प्युटर दुरुस्ती

या व्यवसायासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यावे लागते.  कॉम्प्युटर आणि लॅपटॉप दुरुस्तीचे प्रशिक्षण अनेक शासकीय संस्था देत असतात. खासगी  संस्था Private Institutes Computer  आणि लॅपटॉप दुरुस्तीचे कोर्स प्रशिक्षणही देत असतात. याचे प्रशिक्षण घेऊन आपण कॉम्प्युटर दुरुस्तीचे दुकान सुरू करु शकतात.

 


ज्यूस दुकान  ( Juice Shop)

- ज्यूस हे सर्वांचे आवडीचा पदार्थ आहे. जर आपण ज्यूसचे दुकान सुरू केले तर यातूनही आपण रोजचा बक्कळ नफा कमावू शकतात. हा पण कमी गुंतवणुकीतील एक व्यवसाय आहे.

झेरॉक्स आणि लेमीनेशन  - ( Xerox and Lamination Business )

हा व्यवसाय महाविद्यालये, पुस्तकांची बाजारपेठ आणि शाळा- कॉलेजच्या परिसरात खूप चालणारा व्यवसाय आहे. एक व्यक्ती हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरु करु शकतो. या व्यवसायासाठी २ ते ३ इलेक्ट्रॉनिक मशीनची गरज असते. यात झेरॉक्स मशी, लेमीनेशन, आणि कॉम्प्युटरची साधने घेतल्यानंतर आपल्याला दुकान आवश्यक असते.

पापड व्यवसाय - ( Papad making Business )

पापड उद्योग आपण फक्त १० हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरू करु शकतात. या व्यवसायासाठी आपल्याला बँकेतून कर्जही मिळू शकते. पंरतु या व्यवसायासाठी आपल्याला काही मजूरांची गरज लागेल. व्यवसाय सुरु करण्याआधी एखाद्या वितरक  म्हणजे डिस्ट्री्ब्युटरशी चर्चा करावी लागते. वितरकामार्फत आपण आपल्या ग्राहकांपर्यंत आपला माल पोहचू शकतो. जर चांगल्या गुणवत्तेचा माल ग्राहकांना दिला तर आपला व्यवसाय भरभराटीला येईल.

 

English Summary: Small Business Ideas: A lucrative low-investment business, earning thousands of rupees Published on: 09 August 2020, 03:00 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters