1. बातम्या

शहरातील गरिबांना लॉकडाऊन पडला भारी; खाण्या-पिण्यासह होता आर्थिक प्रश्न

देशात कोरोनाचे थैमान अजून थांबलेले नाही. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा अधिक संसर्ग होऊ नये यासाठी सरकार देशात लॉकडाऊन लागू केले होते. परंतु या लॉकडाऊनचा परिणाम देशातील अर्थव्यवस्था आणि गरीब लोकांच्या जीवनावर अधिक झालेला दिसत आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


देशात कोरोनाचे थैमान अजून थांबलेले नाही. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा अधिक संसर्ग होऊ नये यासाठी सरकार देशात लॉकडाऊन लागू केले होते. परंतु या लॉकडाऊनचा परिणाम देशातील अर्थव्यवस्था आणि गरीब लोकांच्या जीवनावर अधिक झालेला दिसत आहे.  गावातून शहरात कामासाठी गेलेल्या गरीब कामागारांना या लॉकडाऊनचा अधिक फटका बसला आहे. दरम्यान विषयीचा एक सर्व्हे युथ फॉर युनिटी अँड व्हॉलंटरी अक्शनने ( युवा ) सर्वेक्षण केला आहे.

यात व्यक्त करण्यात आलेल्या बाबीमुळे लॉकडाऊनचा फटका शहरी गरिबांना कसा बसला आहे. लॉकडाऊनचा त्रास त्यांना किती झाला आहे, हे नमुद करण्यात आले आहे.  दरम्यान काळात सरकारकडून  अनेक प्रकारची मदत देखील पुरविण्यात आली. या मदतीचा लॉकडाऊन दरम्यान गरीबांना काय फायदा झाला याविषयीही प्रश्न शहरी गरिबांना विचारण्यात आले होते.  हे मदत कार्य २० मार्च ते ३० जून  २०२० दरम्यान करण्यात आले होते.  मुंबई महानगर क्षेत्रातील  एमएमआर तील  २५ हजार ५८९ कुटुंबाचे सर्वेक्षण युवा या संघटनेनेकडून करण्यात आले आहे.  विविध समुदायांवर झालेल्या लॉकडाऊनच्या परिणामावर या दोन्ही बाबींचा थेट प्रभाव पडला आहे. अधिकार आणि मदतकार्य उपलब्धता, अनौपचारिक कामगार, स्थलांतर, त्यांच्या निवासस्थानामुळे उद्भवलेली भयानक अस्थिरता अशा विषयांवर चर्चा करणाऱ्या प्रकरणांच्या माध्यमातून सदर निष्कर्ष विषयवार मांडण्यात आले आहेत.

दरम्यान लॉकडाऊनमध्ये अनेक कामधंदे बंद पडले होते. यामुळे अनेक कामगार, मजुरांना आपल्या गावाचा रस्ता पकडवा लागले होता.  स्थानिक मजुरांच्या हातातही कामे नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. घरकाम कामगारांपैकी बऱ्याच जणांनी सांगितले की, कामावर जाऊ न शकल्याने त्यांना त्यांचे वेतन किंवा मजुरी मिळाली नाही आणि त्यांना नोकरीविषयी असुरक्षिततेचा अनुभव आला. काही जणांनी पर्यायी रोजगारदेखील शोधला होता. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनच्या काळात उज्ज्वला  योजनेच्या अंतर्गत मोफत  गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला मात्र याचा लाभ ग्रामीण भागातील  द्ररिद्य रेषेखालील लोकांना याचा फायदा होत  होता. पण शहरातील गरिबांना  मात्र पैसा मोजावा लागला. तर मोफत रेशन मध्ये ही नागरिकांना फक्त डाळ, तांदूळ , अवलंबून राहावे लागले होते.  लॉकडाऊनमध्ये गरिबांवर उपासमारीची वेळ आली होते. अनेकांना विषाणूपेक्षा उपासमारीमुळे मृत्यू पावण्याची अधिक भीती होती.

प्रतिक्रिया - 

दूध किंवा त्यासारखे अतिरिक्त अन्नपदार्थ विकत घेणे आमच्यासारख्या कुटुंबांसाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही हल्ली अशा गोष्टी खातच नाही. केवळ डाळ आणि पाण्यावर आम्ही आणखी किती वेळ तग धरू शकू?”

- जुही, तुर्भे, नवी मुंबईतील एका झोपडपट्टीत राहणारी मुलगी

२)

आम्हांला विषाणूची भीती वाटतेच. किंबहुना, त्यापेक्षा आम्हांला उपाशी मरण्याची अधिक भीती वाटते.” शहरात अनेक घरकाम करत असतात. त्यांच्याकडील पैसा संपल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. 

English Summary: lockdown effect on city poor people; people face financial and food problem Published on: 14 September 2020, 05:04 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters