1. बातम्या

१ जुलै विशेष महत्त्व, महाराष्ट्र कृषी दिन

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
१ जुलै विशेष महत्त्व,  महाराष्ट्र कृषी दिन

१ जुलै विशेष महत्त्व, महाराष्ट्र कृषी दिन

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते. दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन असे त्यांनी १९६५ मध्ये सांगितले होते. 

वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. शेती आणि शेतकरी हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय राहिले.शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात कृषी विद्यापीठांची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. १९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळ निवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला.राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. रोजगार हमी योजनेतून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण 'कृषी दिन' म्हणून साजरा करतो. 

कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते. दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन असे त्यांनी १९६५ मध्ये सांगितले होते.वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली.

ते हाडाचे शेतकरी होते. शेती आणि शेतकरी हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय राहिले.शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात कृषी विद्यापीठांची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली.१९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळ निवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला.राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली.रोजगार हमी योजनेतून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण 'कृषी दिन' म्हणून साजरा करतो. 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : इंटरनेट

English Summary: July 1 Special Importance, Maharashtra Agriculture Day Published on: 01 July 2022, 05:24 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters