1. बातम्या

आता माघार नाही ! दिवसा विजेसाठी 'स्वाभिमानी' न्यायालयात...

शेतीला दिवसा वीज पुरवठा व्हावा हीच राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला वीजपुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही निर्णय झालेला नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी

उस्मानाबाद : शेतीला दिवसा वीज पुरवठा व्हावा हीच राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला वीजपुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही निर्णय झालेला नाही.

रात्री जंगली प्राणी व सापांचा धोका असतो. त्यामुळे दिवसा वीज दिल्यास शेतकऱ्यांचे काम सुखकर होईल. त्यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलने, निदर्शने करण्यात आली, मात्र यावर काही निर्णय झालेला नाही. शेतकऱ्यांना दिवसा वीज हा प्रश्न घेऊन कोर्टात जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

४६ कारखान्यांची धुराडी बंद; शिल्लक ऊसाचे काय?

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात आंदोलन केले होते. राजू शेट्टी यांनी 10 दिवस आंदोलन केले होते. असे असतानाही सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले.

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; आता खतांचे भाव गगनाला भिडले

शेतीला दैनंदिन वीजपुरवठा व्हावा, ही राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. पण लढा संपलेला नाही. राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास न्यायालयात हा मुद्दा निकाली काढू, असे स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिले आहे.

आनंदाची बातमी : आता सोने तारण ठेवून मिळणार शेतीसाठी कर्ज

याशिवाय हा लढा उभारण्यासाठी 1 मे या महाराष्ट्र दिनी पार पडणाऱ्या ग्रामसभेत दिवसा वीज पुरवठा यावर ठराव घेतला जाणार आहे. ही सर्व आकडेवारी गोळा करुन ग्रामसभेतील ठराव घेऊन आतापर्यंत झालेल्या दुर्घटनेला सरकारला जबाबदार धरावे अशी मागणी केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
Onion Rate : कांद्याला निच्चांकी भाव, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
National Garlic day : राष्ट्रीय लसूण दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या मनोरंजक तथ्य...

English Summary: In 'Swabhimani' court for daytime electricity Published on: 19 April 2022, 03:36 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters