1. बातम्या

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; आता खतांचे भाव गगनाला भिडले

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. पण शेतकऱ्यांच्या अडचणी काय संपत नाही. देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईचा परिणाम शेतकऱ्यांच्या खिशावरही होऊ लागला आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; आता खतांचे भाव गगनाला भिडले

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; आता खतांचे भाव गगनाला भिडले

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. पण शेतकऱ्यांच्या अडचणी काय संपत नाही. देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईचा परिणाम शेतकऱ्यांच्या खिशावरही होऊ लागला आहे.

रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनेक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. खतांचे दर ही वाढत आहेत. देशात सुमारे 25-30 लाख टन डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी), पाच लाख टन म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) आणि 10 लाख टन नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि सल्फर कॉम्प्लेक्स खते (एनपीकेएस) आहेत. खरीप हंगामाच्या पिकात सुमारे ५० लाख टन डीएपीचा वापर होतो. सर्वाधिक परिणाम फॉस्फेटिक आणि पोटॅशियम खतांच्या पुरवठ्यावर होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
Raju Shetty : महाराष्ट्रात बळीराजा हुंकार यात्रा; राजू शेट्टींची घोषणा
Onion Rate : कांद्याला निच्चांकी भाव, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

खतांचे दर

युरिया खत वगळता इतर सर्व खतांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत बाजारात युरियाची किंमत 266.50 रुपये प्रति 45 किलोग्रॅम बॅग असून इफको डीएपीच्या किमतीत वाढ झाल्याने बाजारात 1350 रुपयांच्या आसपास मिळत आहे. आधी पोटॅशची किंमत 1 हजार रुपये होती. आता त्याची नवीन किंमत 1650 रुपये आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये खताचा तुटवडा सातत्याने वाढत आहे. युरियासह अनेक खतांच्या किमती सतत वाढत आहेत. शेतकरी खतांच्या किमती वाढल्याने प्रचंड अडचणीत सापडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
Central Government : अतिरिक्त खताच्या वापराबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
सरकार शेतकऱ्यांना देणार तीन हजार रुपये महिना; लवकर नोंदणी करा आणि घ्या लाभ

English Summary: Increase in the difficulty of farmers; Now the prices of fertilizers have skyrocketed Published on: 18 April 2022, 04:28 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters