मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील सगळ्यात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे देखील अतोनात नुकसान झाले होते.
या दोघी पिकांच्या मागणीच्या मानाने पुरवठा फारच कमी झाल्याने कधी नव्हे एवढा दर बाजारपेठ मिळत आहे.खरिपाचे अंतिम पीक समजल्या जाणाऱ्या तुरीची आवक सध्या सुरू असून अजूनही जर महाराष्ट्रातील बाजार समित्यांचा विचार केला तर तुरीची आवक अजूनही सरासरीच्या तुलनेत मध्ये खूपच कमी होती.तसेच देशातील कर्नाटक सारख्या इतर बाजार समित्यांमध्ये शंभर ते दोनशे रुपये पर्यंत तूर दरात सुधारणा झाली होती. मागच्या आठवड्यामध्ये तुरीच्या भावात थोडीशी नरमाई दिसत होती परंतु शेतकऱ्यांनी तुरीची विक्री खूपच कमी केल्याचे दिसते.
ही दरवाढ होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे तूरडाळीलाबऱ्यापैकी उठाव मिळत असून तसेच प्रक्रिया प्लांट्स आणि स्टॉकिस्ट यांचे खरेदी वाढल्यामुळे सुधारणा दिसून येत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. तसेच तुरीचे आयातदारांनी मागच्या आठवड्यामध्ये तुरीची विक्री काहीशा कमी प्रमाणात केली त्यामुळे देशांतर्गत तुरीला चांगला दर मिळाला. जर सध्याच्या तुरीचे बाजारातील समीकरण पाहिले तर तुरीचे आयात सुरू असली तरी मागणी वाढली की भावात सुधार
णा होत आहे आणि आवकही वाढत आहे.. आठवड्यात आयात तुरीच्या दरात 100 पर्यंत सुधारणा झाली होती. जर सुदान तुरीचा विचार केला तर सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल विकली गेली तर मालावी तुर 4800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला. जर बर्मा या देशाचा विचार केला तर येथे तूर दरात प्रति टन 20 डॉलरपर्यंत सुधारणा झाली होती. येथे आयातीचे तुरीचे दर 810 डॉलरवर पोचले होते.
Share your comments