सध्या भूमिहीन शेतमजूरांसाठी राज्य सरकारने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना 2021 राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याचा शेतीसाठी फायदा होणार आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाकडून जमिनीची खरेदी करण्यासाठी 50 टक्के बिनव्याजी व 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम दिली जाते. यामुळे ही एक फायदेशीर योजना आहे.
यामध्ये शासनाकडून जमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांच्या पती-पत्नीच्या नावे केली जाते. मात्र विधवा व परित्यक्त्या स्त्रियांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाते. यामध्ये दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटूंबाला चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी सरकार मदत करणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.
यामध्ये लाभार्थ्याचे किमान वय 18 व कमाल वय 60 वर्षे निश्चित केले आहे. अर्जदारकडे जमीन नसावी तसेच तो दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा.
लाभर्थ्याला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी असेल आणि त्याची मुदत ही 10 वर्षे असणार आहे. कर्जफेडीची सुरूवात ही कर्ज मंजुरीच्या दोन वर्षांनंतर सुरू होणार आहे. कुटूंबाने 10 वर्षाच्या आत कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. लाभधारकाने जमीन स्वत: कसणे आवश्यक असून तसा करारनामा देणे बंधनकारक आहे.
आवश्यक कागदपत्रे, संबंधित अर्जदाराचा पासफोर्ट आकाराचा फोटो. अर्जदाराने अनुसूचित जाती या प्रवर्गातील असल्याबाबत जातीचे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले विहीत प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, निवडणूक कार्ड प्रत, भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला.
तहसीलदारांच्या मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला,अर्जदारचा वय हे 60 वर्षाच्या खाली असेल तर त्याला वयाचा पुरावा द्यावा लागेल जसे की, शाळा सोडल्याचा दाखला, ज्यावर अर्जदारची जन्म तारीख स्पष्ट अक्षरात असावी,अर्जदार हा दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत विहीत प्रमाणपत्र. शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्यांचा 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र. यासाठी शेतकऱयांनी संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात भेट द्यावी.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; उन्हाळ्यातील पाण्याबाबत अजित पवारांचा मोठा निर्णय..
शेतकऱ्यांनो विक्रमी दराने झालीय सुरुवात, आता रमजानमध्ये कलिंगडातून करा लाखोंची कमाई
Share your comments