सध्या बाजारात मिळणाऱ्या कवडीमोल दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. आता मात्र कांदा उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कांद्याची बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. मात्र गेली तीन महिने बांगलादेशने कांदा आयातीवर बंदी घातली होती. याचा भारताला बराच मोठा फटका बसला होता. आता मात्र कांद्यासाठी बांगलादेशची सीमा खुली करण्यात आली आहे.
भारतीय कांद्यावरील आयात बंदी आज 29 जून रोजी उठवण्यात आली आहे. ईद निमित्त बांग्लादेशाने हा निर्णय घेतला आहे. येत्या 2 जुलैपासून भारतीय बाजार पेठेतून कांदा निर्यात होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कांद्याचे दर वाढले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बंदी का उठवली?
बांग्लादेश हा जागतिक पातळीवर भारतीय कांद्याला बाजारपेठ मी,म्हणून महत्वाचा आहे. मात्र यंदा बांग्लादेशात स्थानिक कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्याने दरात घट झाली होती. दराची घसरण थांबविण्यासाठी बांग्लादेशने भारतातील कांद्यावर आयातबंदी केली. सध्या बांग्लादेशातील कांदा संपत आला आहे.
उत्पनात घट झाल्याने कांद्याचे भाव वाढले. ऐन ईद च्या सणामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे. त्यामुळे भारतीय कांदा आयत करण्यासाठी परवानगी दिली गेली आहे. बांग्लादेशमधील राष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण विभागाचे महासंचालक एएचएम सफिकझमान यांनी परिपत्रक काढून कांद्यावरील बंदी हटवली.
गव्हानंतर तांदूळ निर्यातीवरही बंदी? भारतात तांदळाची किंमत १० टक्क्यांनी वाढली
नाशिकमधून सर्वाधिक निर्यात
नाशिक जिल्ह्यातून दररोज बाजारात 80 ते 90 हजार क्विंटल कांद्याची विक्री होते. शिवाय बांग्लादेशात नाशिकमधून सर्वाधिक कांद्याची निर्यात केली जाते त्यामुळे काही प्रमाणात दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
"जगामध्ये अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बाजरी मोलाचे योगदान देऊ शकते"
महाराष्ट्रातील खरीप पेरणी असमाधानकारक; राज्य सरकार घेणार पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा
Share your comments