ज्यादा वाज किंवा दामदुप्पट सारख्या योजनेतून लोकांची आर्थिक फसवणूक झालेल्याची प्रकरणे आतापर्यंत बरीच झाली आहेत. मात्र करवीर पन्हाळा, राधानगरी व शाहूवाडी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घातला गेल्याचा प्रकार उघडीस आला आहे. चक्क शेण खरेदीच्या बहाण्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान केले आहे
करवीर तालुक्यासह चार तालुक्यांत जनावरांच्या शेणातून शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक केली आहे. संबंधित व्यक्तीने एका कंपनीचा प्रतिनिधी बनून गेली सहा महिने करवीर, पन्हाळा, राधानगरी व शाहूवाडी तालुक्यातील काही गावांतील लोकांशी संपर्क साधला. तसेच त्यांना शेणापासून लाकूड बनवण्याच्या प्रकल्पाची माहितीही दिली. शिवाय हा प्रकल्प कोते येथे उभारण्यात येणार आहे. यासाठी लागणारे मशीनदेखील खरेदी केल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
त्यानंतर शेतकऱ्यांकडून १ रुपये किलोने शेण खरेदी करायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे करवीर तालुक्यात अनेक गावांत शेण खरेदी सुरू झाले. मात्र दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांना पैसे काही मिळाले नाही. शेतकरी संबंधित प्रतिनिधींशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान झाले आहे. शिवाय संबंधित प्रतिनिधीने शेण वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाकडून करार म्हणून ११ हजार रुपये तर ग्रामदूतचे रजिस्ट्रेशनसाठी १ हजार १०० रुपये घेतले आहे. किमान हे पैसे परत मिळावेत यासाठी शेतकरी धडपड करत आहेत.
आता सातबारा उतारा करता येणार स्कॅन, शेतकऱ्यांचा फायदाच फायदा..
स्टार अग्रोवोन नामक कंपनीच्या प्रतिनिधीने हा कारभार केला आहे आणि त्या प्रतिनिधींकडून पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आमच्याकडेच तगादा लावत असल्याचे जे. एन. पाटील ग्रामदूत भामटे यांनी सांगितले. तसेच संबंधित प्रतिनिधीने बँकेचा धनादेश दिला आहे मात्र बँकेच्या खात्यावर पैसेच नाहीत. आम्ही वारंवार त्या प्रतिनिधीला संपर्क साधत आहोत मात्र संबंधित व्यक्तीकडून कोणतीच दाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
खुशखबर! धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
बकऱ्याने सगळी रेकॉर्डच तोडली, तर 'कॅप्टन' विकला सर्वात महाग, किंमत ऐकून डोळे होतील पांढरे
Share your comments