आतापर्यंत तुम्ही सोनं, चांदी, कार यासह मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या घटना ऐकल्या असतील. आता मात्र शाहूवाडी येथील बिरदेव माळ परिसरात सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी ४३ कोंबड्या व ४० कोंबडीची पिल्ले तसेच ५० अंडी खुरुड्यासह चोरली आहेत.
यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. सरुड येथील सुभाष रंगराव कुराडे व बळवंत तुकाराम कुराडे यांचे बिरदेव माळ परिसरात जनावरांचे शेड आहे. या शेडमध्येच त्यांनी कुक्कुटपालन केले होते.
रात्री अज्ञात चोरट्यांनी सुभाष कुराडे यांच्या शेडमधील ३५ कोंबड्या दोन कोंबडे, ३० कोंबडीची लहान पिल्ली तसेच शेडमध्ये असणारी ५० अंडी खुरुड्यासह चोरून नेली. सकाळी त्यांच्या लक्षात ही बाब आली.
लसणाची प्रति किलो दोनशे रूपयांकडे वाटचाल, शेतकरी सुखावला...
शाहूवाडी पोलिसांनी येथील चोरींचा छडा लावुन या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अशाच प्रकारे चोऱ्या होत आहेत.
उन्हामुळे चिकनच्या दरात मोठी, पिलांची मर वाढली..
याठिकाणी शेतातील वस्तू, खते चोरुन नेणारी भुरट्या चोरांची एक टोळी सक्रीय आहे. यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
शेतीची अवजारे चोरणारी टोळी अखेर जेलबंद! पोलिसांनी अवजारेही केली जप्त..
५५०० रुपये लिटरला गाढवाचे दूध विकणारा हा माणूस झाला करोडपती
शेतकऱ्यांनो पावसाळा येतोय, पावसाळ्यात जनावरांची कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या...
Share your comments