1. पशुधन

पाळा 1 हजार कडकनाथ कोंबड्या अन कमवा 10 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
if you rearing 1 thousand kadaknaath hen you can earn more than lakh rupees

if you rearing 1 thousand kadaknaath hen you can earn more than lakh rupees

 उत्कृष्ट चवीमुळे चिकन हे प्रत्येक मांसाहारी व्यक्तीचे आवडते खाद्य मानले जाते.आज आपण या लेखात अशा चिकन बद्दल माहिती घेणार आहोत,त्याची चव आणि गुणधर्म सामान्य चिकन पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. त्याचबरोबर या प्रजातीच्या कोंबडीचे संगोपन करून लाखो रुपये सहज कमवत आहेत.

ती कोंबडीची जात म्हणजे मध्य प्रदेश राज्यातील झाबुवा जिल्ह्यात आढळणारी कडकनाथ कोंबडी ही होय. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जातीचे एक हजार कोंबडीपालनातून तुम्ही लाखो रुपये सहज कमवू शकता.

 या कोंबडीचे वैशिष्ट्य

 भारतातील हे एकमेव डार्क मीट चिकन आहे. पांढऱ्या रंगाच्या चिकन ऐवजी त्यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप कमी असल्याचे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे.

तसेच अमिनो आम्लाची पातळी जास्त असते. देशी किंवा बॉयलर चिकनच्या तुलनेत हे खूप चवदार आहे. हे मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात आढळते व त्या ठिकाणी या कोंबडी ला कालीमासी म्हणून ओळखले जाते.

कडकनाथ कोंबडीचे मांस,रक्त, चोच, अंडी, जीव आणि सर्व शरीर काळे आहे. यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात चरबी खूप कमी आहे. त्यामुळे हृदय रोगी आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायाकडे वळा, 'ही' ३५ कारणे तुम्हाला मिळवून देतील लाखो रुपये..

ही कोंबडी कुठे मिळते?

 हे कोंबड्या प्रामुख्याने मध्य प्रदेश राज्यातील झाबुआ जिल्ह्यातील आदिवासी भागात आढळतात. परंतु आत्ता कडकनाथ कोंबडीची जात छत्तीसगड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये आढळू लागले आहे.

या कोंबडीला देशभरात मोठी मागणी असून तिच्या तीन प्रजाती आपल्याकडे आहेत ज्यात  जेड ब्लॅक, पेन्सिल आणि गोल्डन कडकनाथ यांचा समावेश आहे.

झेड ब्लॅक चे पंख पूर्णपणे काळे आहेत, पेन्सिल कडकनाथचा आकार पेन्सिल सारखा आहे. तर गोल्डन कडकनाथ अर्थात सुवर्ण कडकनाथच्या पंखांवर सोनेरी ठीपके असतात.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो 'शेळी आणि कोंबडी'च्या आहाराची अशी घ्या काळजी; होईल बक्कळ नफा

कडकनाथ कोंबडीचे पालन कसे सुरु करावे?

 कडकनाथ कोंबडी चे उत्पादन करून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. कडकनाथ ची शंभर पिल्ले ठेवली तर त्यासाठी तीनशे चौरस फूट जागा लागेल. त्याचबरोबर एक हजार कडकनाथ कोंबड्या साठी एक हजार 500 चौरस फूट जागा लागणार आहे.

परंतु यामध्ये लक्षात ठेवावे की चिकन विलेज किंवा शहराबाहेर अशी जागा असावी ज्या ठिकाणी पाणी, विजेचा पुरेसा पुरवठा असेल. कडकनाथ कोंबड्या आणि कोंबड्यांसाठी असे शेड बनवावे ज्यामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश व हवा जाऊ शकेल.

त्याचबरोबर दोन शेड एकत्र नसावेत. एका जातीची कोंबडी एकाच शेडमध्ये ठेवावी हेही लक्षात ठेवले पाहिजे. तसेच कडकनाथचे पिल्ले आणि कोंबड्यांना अंधारात किंवा रात्री उशिरा खाद्य देऊ नये.

नक्की वाचा:रात्री 'हे'लक्षण दिसत असेल तर आतापासून व्हा सावध,असू शकतो डायबिटीस

 900 ते 1000 रुपये प्रतिकिलो

 कडकनाथ कोंबडीच्या अंड्याला बाजारात मोठी मागणी आहे. कांद्याची किंमत  सुमारे पन्नास रुपये असून कडकनाथ कोंबडा 900 ते 1000 रुपये प्रति किलो आहे.

त्याचबरोबर एका दिवसाच्या पिलांसाठी 70 ते 100 रुपये मोजावे लागतात. जर तुम्ही 1000 कडकनाथ कोंबडीची पिल्ले  वाढवली तर तुमचे उत्पन्न लाखात जाईल.

English Summary: if you rearing 1 thousand kadaknaath hen you can earn more than lakh rupees Published on: 23 June 2022, 12:27 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters