सध्या शेतकरी बंधू (Farmers) पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक पद्धतीचा देखील अवलंब करत आहेत. तसेच शेती सोबत अनेक जोडव्यवसायांना प्राधान्य देत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम (Farming) राबवताना दिसत आहेत. आता शेतकरीसुद्धा काळाबरोबर आपल्या शेती पद्धतीत बदल करून बक्कळ कमाई करत आहेत. असाच एक उपक्रम बारामती तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी केला आहे.
बारामती तालुक्यातील जळगाव सुपे या गावातील काही शेतकऱ्यांनी एकत्र शेती पद्धतीचा अवलंब करून शेती व्यवसायात स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. सुपे या गावातील शेतकऱ्यांनी बारामती ॲग्रोस्टार फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. या कंपनीची स्थापना केली. व या कंपनीमार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांच्या मदतीने लाभ देण्यात येणार आहे.
बारामती ॲग्रोस्टार फार्मर प्रोड्यूसर कंपनी ही शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा कसा होईल यावर जास्त भर देणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ कशी होईल तसेच शेतकऱ्यांना विविध योजनांचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल याकडे लक्ष देण्याचे काम या कंपंनीमार्फत करण्यात येणार आहे. तसेच कंपनी जरी शून्यातून पुढे येत असली तरी एक ना एक दिवस जगापुढे उत्तम उदाहरण बनेल अशी प्रतिक्रिया कंपनीचे संचालक अनिल वाघ यांनी यावेळी दिली.
यासंदर्भात कंपनीच्या संचालक मंडळाने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी बारामती तालुक्यातील जळगाव सुपे गावातील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या केंद्र शासनाच्या FPO स्कीम अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती तसेच कंपनीच्या माध्यमातून उत्पादित करीत असलेल्या खाद्यतेल (शेंगदाणा तेल, करडई तेल व सूर्यफूल तेल) या उत्पादनाची माहिती दिली.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेती करून उत्पादित मालावर प्रक्रिया उद्योग सुरू करावी व शेतीचे उत्पादन व उत्पन्नात वाढ करावी असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. शिवाय शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासोबत जळगाव सुपे व परिसरातील शेती विषयक, जलसंधारण पायाभूत सुविधा शेतीच्या पाण्याचा प्रश्न भौगोलिक परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल, शैक्षणिक सुविधा यासांरख्या अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली.
अखेर मोदींनी 'ती' घोषणा केलीच; खात्यावर होणार उद्याच पैसे जमा
तसेच शेतकऱ्यांनी पवार साहेबांना पाणी फाउंडेशन अंतर्गत गट शेती स्पर्धेमध्ये कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणारी पिके (तूर मूग बाजरी मेथी कोथिंबीर सोयाबीन मका) घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. पवार साहेबांनी शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच शेतकऱ्यांनी गट शेती प्रयोग यशस्वी करावा त्याची पाहणी करण्यासाठी मी नक्कीच येईल अशी ग्वाहीदेखील पवार साहेबांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी बारामती ऍग्रोस्टार फार्मर प्रोडूसर कंपनी चे चेअरमण सुनिल जगताप संचालक अनिल वाघ, नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी वैभव भापकर, आनंदराव खोमणे, संतोष जगताप, स्वपनिल जगताप आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
मोदींनी घेतलेल्या साखर निर्यात बंदीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले ...
दोन भावांनी फुलशेतीतून फुलवले आयुष्य; आज लाखोंमध्ये खेळतात
Share your comments