1. बातम्या

अवकाळी पावसाचा धुमाकूळ; वीज कोसळून तीन गायींचा बळी

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याला देखील अवकाळी पावसाने झोडपले असून विजांच्या गडगटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यात ठिकठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या असून मोहोळ तालुक्यात अचानक आलेल्या पावसात वीज कोसळून तीन गायींचा मृत्यू झाला.

Three cows killed in lightning strike

Three cows killed in lightning strike

राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह जनावरांची मोठी धावपळ पहायला मिळाली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याला देखील अवकाळी पावसाने झोडपले असून विजांच्या गडगटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यात ठिकठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या असून मोहोळ तालुक्यात अचानक आलेल्या पावसात वीज कोसळून तीन गायींचा मृत्यू झाला.

वादळी वारा आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जनावरांसह पिकांचे मोठे नुकसान केले. मात्र, पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने तापमानाचा वाढता पारा आणि उकाड्याने हैराण झालेला नागरिक सुखावला आहे. सोलापूर जिल्ह्यात शनिवार मध्यरात्री पासून पावसाला सुरुवात झाली. मात्र रविवार पहाटेपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात जवळपास पावसाने हजेरी लावली.

आकाशात ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट सुरूच होता. दरम्यान मोहोळ तालुक्यतील येणकी गावात वीज कोसळून तीन गायींचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी धनाजी नागनाथ कदम यांच्या गायी शेतशिवारात चारा खात होत्या. याच ठिकाणी कडकडाटासह वीज कोसळल्याने तिन्ही गायींचा जागीच मृत्यू झाला.

तालुक्यात यापूर्वीही वीज कोसळण्याच्या घटना घडून जनावरे आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी सध्या मदतीची मागणी करत आहेत. सध्या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या;
Sugarcane; उसाच्या खोडव्याचे टनीज का घटतय? शेतकऱ्यांनो असे करा व्यवस्थापन...
अखेर पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पैसे जमा..
आता पशुधन विमा योजना लवकरच होणार सुरु, अनेकांना होणार फायदा

English Summary: A torrential downpour; Three cows killed in lightning strike Published on: 25 April 2022, 03:58 IST

Like this article?

Hey! I am मनोज रामचंद्र दातखिळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters