1. बातम्या

भाजपचे नेते येतील अन् बारामतीचा विकास पाहून जातील; जयंत पाटलांचा भाजपला खोचक टोला

देशात आगामी लोकसभेची मोर्चेबांधणी आताच सुरु झाल्याचे दिसत आहे. भाजपकडून २०२४ च्या लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. भाजपचा प्रत्येक मंत्री विविध मतदार संघात जाणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून बारामती मतदार संघासाठी अधिक लक्ष दिले असल्याचे दिसत आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
jayant patil

jayant patil

देशात आगामी लोकसभेची (Lok Sabha Elections) मोर्चेबांधणी आताच सुरु झाल्याचे दिसत आहे. भाजपकडून (BJP) २०२४ च्या लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. भाजपचा प्रत्येक मंत्री विविध मतदार संघात जाणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून बारामती (Baramati) मतदार संघासाठी अधिक लक्ष दिले असल्याचे दिसत आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.

लवकरच बारामती मतदार संघामध्ये (Baramati Constituency) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) येणार आहेत. यावर जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, भाजपाचे नेते येतील आणि बारामतीचा विकास पाहून परतेल असा टोला त्यांनी लगावला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे आणि फडणवीस सरकार आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णयाचा धडाका लावला आहे. यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बिग ब्रेकिंग: महाराष्ट्राच्या राजकारणात भुकंप! माजी मुख्यमंत्र्यासह सात आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वेगवेगळ्या निर्णयाचा धडाका सुरु आहे. यामधील काही निर्णय हे जनतेच्या हिताचेही आहेत. यामुळे विकास कामे देखील मार्गी लागतील. पण चुकीचे निर्णय घेतले तर मात्र, सुट्टी नाही. लागलीच त्यावर ऑब्जेक्शन घेतले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

राज्यात सध्या आगामी महापालिका निवडणूका होणार आहेत. त्यावर भेटीगाठीचे सत्र सुरु आहे. भाजप नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचत आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजप-मनसे युती होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर जयंत पाटील यांनी खोचक टीका केली आहे.

नौदलाला मिळाला नवा ध्वज! PM मोदींकडून छत्रपती वीर शिवाजी महाराज यांना समर्पित...

निवडणुकांजवळ आल्या की कुणाचा वापर करुन घ्यावयाचे हे भाजपाला चांगले माहित आहे. त्यामुळे महापालिकेच्या तोंडावर त्यांनी मनसेशी जवळीक साधली आहे. अशावेळी आपल्याला मित्र मिळावा ही प्रत्येकाची भावना असते असे म्हणत पाटील यांनी भाजपला चिंता काढला आहे.

काँग्रेसला खिंडार पडणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. त्यावर जयंत पाटील म्हणाले, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. पण ते कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. त्यामुळे असा विचार करणार नाहीत. पण भाजपाला आणखी आपले संख्याबळ वाढवण्यासाठीची ही खटाटोप आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या:
मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार...
शेतकऱ्यांचे गजब आंदोलन! कांद्याचे दर घसरल्याने बनवला कांद्याचाच गणपती

English Summary: BJP leaders will come and go after seeing development Baramati Published on: 03 September 2022, 10:08 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters