1. बातम्या

फडणवीस आणि चव्हाणांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण; चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं, ही भेट...

मुंबई: राज्याच्या राजकारणामध्ये आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नवा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Fadnavis and Chavan

Fadnavis and Chavan

मुंबई: राज्याच्या राजकारणामध्ये आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नवा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानंतर आता त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने सत्तांतरानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या अंदाज वर्तवला जात आहे.

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ! माजी मुख्यमंत्री आणि 9 आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार..

भेटीवर अशोक चव्हाण म्हणाले...

अशोक चव्हाण म्हणाले आशिष कुलकर्णींच्या घरी दर्शनासाठी गेले होतो, तेव्हा फडणवीस यांच्याशी उभ्या-उभ्या भेट झाली. आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. परवा काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा आहे, त्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

बिग ब्रेकिंग: महाराष्ट्राच्या राजकारणात भुकंप! माजी मुख्यमंत्र्यासह सात आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?

English Summary: meeting between Fadnavis and Chavan sparked political discussions Published on: 02 September 2022, 02:07 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters