शेतकरी शेतात अमाप मेहनत घेत असतो. मात्र आपत्कालीन संकटांमुळे उत्पन्नाचे बरेच नुकसान होते त्यातून कर्जबाजारी, इतर आर्थिक समस्या निर्माण होतात. आणि आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी बंधूंसमोर असंख्य अडचणींचा डोंगर उभा राहतो. सरतेशेवटी काहीच पर्याय न उरल्याने आत्महत्या सारख्या घटना घडतात. नुकताच ३० मार्च पर्यंत पश्चिम विदर्भ शेतकरी यांच्या आत्महत्येचा अहवाल समोर आला आहे. विभागीय उपायुक्तांचा अहवाल सरकार समोर सादर झाला.
या अहवालात पश्चिम विदर्भ शेतकरी यांच्या आत्महत्येत वाढ होताना दिसत आहे. ३० मार्च पर्यंत म्हणजेच या ९० दिवसात जवळजवळ २७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालानुसार दर आठ तासांनी एक शेतकरी आत्महत्येला बळी पडत आहे. राज्यात सगळ्यात जास्त अमरावती जिल्ह्यात आत्महत्या होत असताना दिसत आहेत. तब्ब्ल ८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्याची नोंद आहे.
मागील वर्षी १,१७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मागील काही महिन्यांपासून ही संख्या वाढताना दिसत आहे. जानेवारी महिन्यात ८८,फेब्रुवारी महिन्यात १०९ तर मार्च महिन्यात ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्याच भयाण वास्तव समोर आलं आहे. ओढवलेल्या परिस्थितीला तोंड देत शेतकरी जगत आहे मात्र कुटूंबाची जबाबदारी, मुलामुलींचे शिक्षण, मुलीचे लग्न, अशा एक ना अनेक गोष्टींचा त्यांना सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांसाठी योजना असताना त्याचा बऱ्याच गरजू शेतकऱ्यांना फायदा होत नाही. यंदाच्या अवकाळी पावसाने शेतकरी बंधूंचे बरेच नुकसान केले. अचानक झालेल्या पावसामुळे हंगामी पिकांचे बरेच नुकसान होऊन त्या पिकांचा दर्जा खालावला. त्यातून शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. या गोष्टींमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
महसूल विभागाकडे शेतकरी आत्महत्येच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यांच्या आकडेवारीनुसार २००१ पासून पश्चिम विदर्भात तब्बल १७,९३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद आहे. यातील ८,१६६ जणांना शासनाकडून मदत मिळाली. तर ९,५३५ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली. तर २३७ प्रकरणे प्रलंबित करण्यात आलेली आहे.
महत्वाच्या बातम्या;
जमिनीचा पोत ओळखण्याची 'फिल' पद्धत आणि काळा मातीची वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर माहिती
गावाच्या विकासासाठी मिळालेला 100 टक्के निधी खरंच वापरण्यात येतो का? ‘या’ ऍपद्वारे मिळवा माहिती
White Jamun; इंदापूरच्या पांढऱ्या जांभळाची राज्यात चर्चा, किलोला 400 रुपयांचा दर
Share your comments