1. कृषीपीडिया

आपत्कालीन संकटांपासून कसे कराल पिकांचे संरक्षण? शेडनेटमधील शेती म्हणजे काय ?

शेडनेट शेती कुठल्याही सीझनमध्ये नेहमी फायदेशीर ठरते. हिवाळ्यातील दव, धुके, अति थंडी, तसेच उन्हाळ्यातील अति उच्च तापमांनापसून पिकांचं संरक्षण होते. वाढत्या किडींचे प्रमाण पिकांचे अतिप्रमाणात नुकसान करू शकते मात्र अशा शेतीमुळे किडींचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
agriculture in Shednet farmar

agriculture in Shednet farmar

शेडनेट म्हणजे बांबू किंवा वासे वापरुन तयार करण्यात आलेलं छोट 'शेड'. याला हरित गृह या नावानेही ओळखले जाते. यांतुन ऊन, वादळ, पाऊस तसेच आपत्कालीन संकटांशी काही प्रमणात पिकांच संरक्षण केले जाते. हंगामी तसेच बिगर हंगामी पिकाची लागवड करण्यासाठी तसेच उच्च गुणवत्ता व भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी शेड नेट सारख्या गोष्टी उपयुक्त ठरतात. शेडनेट हाऊसमुळे शेतातील तापमान, कार्बन-डाय ऑक्‍साईड व आद्रता यांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. या लेखात आपण शेडनेटबद्दल तसेच शेडनेटमध्ये घेतली जाणारी पिके व त्यांचे व्यवस्थापन याबद्दल जाणून घेणार आहोत.

शेडनेटचे फायदे -
शेडनेट शेती कुठल्याही सीझनमध्ये नेहमी फायदेशीर ठरते. हिवाळ्यातील दव, धुके, अति थंडी, तसेच उन्हाळ्यातील अति उच्च तापमांनापसून पिकांचं संरक्षण होते. वाढत्या किडींचे प्रमाण पिकांचे अतिप्रमाणात नुकसान करू शकते मात्र अशा शेतीमुळे किडींचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते. विविध फळं आणि भाजीपाला यांसारख्या कृषी उत्पादनांची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. औषधी वनस्पती, फुलझाडे, झाडाची पाने तसेच भाज्या आणि मसाल्यांच्या लागवडीस शेडनेट शेती उपयुक्त ठरते.

अति उष्णतेमुळे बऱ्याचदा रोप करपतात मात्र शेड हाऊस शेती पद्धतीमुळे रोपणाची मर कमी होते. किटकनाशक किंवा रोग नाशकचा पिकांवर केलेला अति मारा पिकांसाठी हानिकारक असतो. शेडनेटमुळे या कीटकनाशकांचा कमी प्रमाणात उपयोग करून प्रभावीरित्या नियंत्रण मिळवता येते. तसेच शेडनेटमुळे पाण्याचे प्रमाण कमी लागते आणि बचत होते.

शेडनेटमधील पीक व्यवस्थापन -तापमान वाढ होत असल्यास हरितगृहाचे कर्टन दिवसभर उघडे ठेवावेत तसेच शेडनेट हे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पसरून ठेवावे,व त्यानंतर ते उघडावे. वाढत्या तापमानाच्या काळात पाणी व्यवस्थापन महत्वाचा भाग आहे. सकाळ व संध्याकाळ वाफसा स्थिती राहील या पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे. शेडनेटचं तापमान हे ३२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि रात्री २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असावं.

तसेच आद्रता ६० टक्के ठेवण्याचा प्रयत्न करावा. जैविक खते आणि कीडनाशकांचा वापर करावा. नवीन पिकाची लागवड करायची असेल तर अगोदर पाणी आणि मातीचे परीक्षण करून घ्यावे आणि त्यानंतर आवशक्यतेनुसार खत मात्रा देण्याचे नियोजन करावे. तसेच नवीन भाजीपाला लागवड करावयाची असेल तर जमीन तापू द्यावी व त्यानंतर मातीमध्ये कुजलेले शेणखत मिसळावे आणि यामध्ये तागाची लागवड करून फुलोऱ्यात असताना गाडावा.

पिकाची लागवड केलेल्या क्षेत्रात मातीमध्ये क्षार वाढले असतील तर कुदळणी करून घ्यावी व त्यात जिवाणू खतांचा वापर वाढवावा. ई-नाम संकेत स्थळाचा बाजार भाव आणि शेतमाल पुरवठ्यासाठी वापर करावा. परदेशी भाजीपाला लागवडीचे नियोजन करावे पण त्यापूर्वी बाजारपेठेतील चालू परिस्थितीचा अंदाज घ्यावा. तसेच शेडनेटचे वादळी वारे, अवकाळी पावसामुळे नुकसान होते, हे लक्षात घेऊन विमा उतरवून घ्यावा. हवामानबदलामुळे होत असलेल्या परिस्थितिशी जुळवून घेण्याकरिता शेडनेट हा मार्ग शेतकरी वर्गासाठी शेत व्यवस्थापण उत्तम आणि सोयीस्कर उपाय आहे.

महत्वाच्या बातम्या;
गरिबांचे कोल्डड्रिंक महागले! सर्वसामान्यांना दुष्काळात तेरावा महिना
राज्यात लोडशेडिंगवरून सरकारचे पितळ उघडे, विरोधकांनी धक्कादायक माहिती आणली समोर..
आता ना गावठी ना देशी, आता फुलांपासून थेट विदेशी, राज्य सरकारचा निर्णय..

English Summary: How to protect crops from emergencies? What is agriculture in Shednet? Published on: 23 April 2022, 09:39 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters