अवकाळी पाऊस आणि गारपीट याचा फटका पिकांना बसत आहे. या बदललेल्या हवामानामुळे तापमानात घट झाली आहे. त्याचा पिकांवर परिणाम होत आहे. या हवामानात पिकांची कशा प्रकारे काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी पीक परिस्थितीबाबत सल्ला दिला आहे.
द्राक्ष
-
या थंड वातावरणामुळे मण्यामध्ये क्रकिंगची समस्या वाढू शकते.
-
या समस्याचा सामना करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे.
-
थंडीच्या वातावरणात बागेतील जमीन वाफसा स्थितीमध्ये ठेवावी.
-
व पिंक बेरीची समस्या वाढू नये यासाठी तापमान कमी होताच ठिकठिकाणी शेकोट्या पेटवाव्यात. घड पेपरने झाकावेत.
-
थंडी वाढल्यास मण्यांचा आकार वाढण्यात अडचणी येतील. यावर उपाय म्हणून बेडवर आच्छादन महत्त्वाचे आहे. त्यासोबत मुळे कार्यरत राहील, यासाठी उपाययोजना कराव्यात.
संत्री
-
अचानक आलेल्या अवकाळी पावासामुळे आणि रागपिटीमुळे पाण्याचा ताण तुटला आहे. वातावरणातील थोडी थंडी कमी झाल्यावर पाणी द्यायला काही हरकत नाही.
-
डिसेंबर महिना आणि जानेवारीचा पहिला आठवडा असे एकुण 30 ते 40 दिवसांचा ताण बसला आहे.
-
दुपारी ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण आत्ता आहे. रात्रीचे तापमान थंड जरी झाले तरी एक दोन दिवसांनंतर दिवसभर ऊन पडेल.
-
दुपारचे तापमान फुले येण्याच्या प्रक्रियेस अनुकूल आहे. जानेवारी अखेरीस पूर्ण बागेमध्ये फुले येतील. ही लवकर आलेली फुले व फळधारणा योग्य राहील, असे तज्ञ्ज्ञांचे मत आहे. तज्ञ्ज्ञांच्या सल्लाने संत्री बागेला आवश्यकेतेनुसार खतांच्या मात्रा देण्यात याव्या.
डाळिंब
-
ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे अचानक थंडी वाढली आहे. या वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे.
-
तापमान २५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. अशा ठिकाणी नवीन बहार पकडलेला असल्यास फुले येण्यामध्ये समस्या होऊ शकतात.
Share your comments