Indapur : गेले काही दिवस राज्यात कधी अति तापमानामुळे तर कधी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांची पिके जळून खाख झाल्याच्या कितीतरी घटना घडल्या आहेत. कधी कडबा तर कधी उसाचे फड जळल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशीच दुर्घटना इंदापूर तालुक्यातील अंथूर्णे गावातील एका महिला शेतकऱ्याबाबत घडली आहे.
शॉर्टसर्किटमुळे महिला शेतकऱ्याच्या दोन गाईंचा मृत्यू झाला होता. आपत्ती व्यवस्थापनातून या महिलेले वेळेत मदत होणे अपेक्षित होते मात्र तस काही घडलं नाही. होत असलेली दिरांगई व त्या महिलेचे हाल, तिचे आर्थिक नुकसान पाहून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 50 हजाराची मदत केली आहे. त्यामुळे या महिला शेतकऱ्याला मदतीचा हात मिळाला आहे.
शेतकरी आपले सर्वस्व शेतीसाठी वाहून देतात. एवढे कष्ट करूनही बऱ्याचदा त्यांना नुकसानीला सामोरे जावेच लागते. या झालेल्या नुकसानीमुळे कितीतरी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होते. त्यातून आत्महत्येसारख्या घटना घडतात.
धरण मोबदल्यात कोट्यावधींचा घोटाळा! शेतकऱ्यांच्या जागी बोगस व्यक्ती; तहसिलदारही अटकेत
दुर्घटनेत 2 गायींचा झाला होता मृत्यू
इंदापूर तालुक्यात मध्यंतरी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी शॉर्टसर्किट होऊन दुर्दैवाने गोठ्यात बांधलेल्या 2 गायींचा जागेवरच मृत्यू झाला होता. शिवाय गावाला लागून असलेल्या शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन करणे तसेच अडचणीच्या काळात त्यांना हवी ती मदत करणे हेच ठाकरे सरकारचे धोरण आहे. यंदाचे वर्ष हे महिला शेतकऱ्यांच्या सन्मानाचे आहे. या गोष्टीची जाणीव ठेऊन पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या महिला शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य केले.
शेतकऱ्यांशी साधला संवाद
आपत्कालीन संकंटांमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. यंदा अवकाळी पाऊस ,अति तापमान आणि असंख्य आपत्कालीन संकंटांमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत बरीच वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न चालू आहे.
मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अंथूर्णे गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जेव्हा त्यांना समजले की, या महिला शेतकऱ्याची परिस्थिती हालाखीची आहे तेव्हा मात्र त्यांनी लागलीच 50 हजारांची मदत केली.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो असा प्रयोग का करत नाही? भाव नव्हता म्हणून पठ्ठ्यांनी परदेशात विकला कांदा, झाले मालामाल
women farmer's success: महिला शेतकऱ्याची कमाल! चक्क गायीच्या शेणापासून तयार केला नैसर्गिक कलर
Share your comments