1. बातम्या

Scheme For Farmer: 'ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे' हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी ठरेल फायद्याचा , जाणून या योजनेबद्दल सविस्तर

केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना फायद्याच्या अनेक योजना आखल्या जात आहेत व इतकेच नाही तर त्यांची अंमलबजावणी देखील चांगल्या पद्धतीने केली जात आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
tractor aamche disel tumche is concept can give more finaacial benifit to farmer

tractor aamche disel tumche is concept can give more finaacial benifit to farmer

केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना फायद्याच्या अनेक योजना आखल्या जात आहेत व इतकेच नाही तर त्यांची अंमलबजावणी देखील चांगल्या पद्धतीने केली जात आहे.

. या सगळ्या योजनांच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर सध्या खरीप हंगामाची तयारी जोरदार सुरू असून शेतीची पूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. सहाजिकच शेताच्या पूर्वमशागत जसे की नांगरणी, रोटावेटर इत्यादी कामांसाठी ट्रॅक्टरच्या आवश्यकता भासते.

डिझेलचे दर एवढे गगनाला पोहोचले आहेत की, शेतकऱ्यांना हे दर परवडेनासे झाले आहेत. या दरवाढीमुळे जमिनीच्या मशागतीचा खर्च देखील दुपटीने वाढला आहे. या सगळ्या समस्या वर उपाय म्हणून राज्यसरकारने ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी ही tनक्कीच फायद्याची ठरेल. योजना सर्वप्रथम अकोला जिल्ह्यात राबवण्यात येणार असून  देशाला ही मार्गदर्शक ठरणार आहे.

विधवा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला  शेतकऱ्यांना पिकांची पेरणी ते कापणी(cultivation And Harvesting)दरम्यान आर्थिक सहाय्य व्हावे व त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा या उद्देशाने ट्रॅक्टर आमचा,डिझेल तुमचे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

त्यामुळे महिला शेतकऱ्यांना या उपक्रमाचा चांगलाच आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी फायदा होऊ शकतो. याबाबतची माहिती आमदार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. अकोला जिल्ह्यातील सर्व निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांची आर्थिक स्वावलंन होण्यासाठी या उपक्रमाची मदत होईल.

जर हा उपक्रम अकोला जिल्ह्यांमध्ये यशस्वी झाला तर राज्यभरात होण्यासाठी आपण प्रयत्न करू असे देखील बच्चू कडू यांनी सांगितले.

या माध्यमातून  विधवा महिला शेतकऱ्यांकरिता पेरणी ते कापणी या दरम्यानजो काही खर्च करावा लागणार आहे तो शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचे आव्हान कडू यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:'कमवा आणि शिका' अंतर्गत टाटा मोटर्स मध्ये सुवर्णसंधी! बारावी पास असाल तर करा संधीचे सोने

नक्की वाचा:तुम्हीही पॅरासिटामोल घेता का? जर घेत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी, वाचा सविस्तर

नक्की वाचा:Yellow Alert To 13 District: महाराष्ट्रात येत्या तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज

English Summary: tractor aamche disel tumche is concept can give more finaacial benifit to farmer Published on: 18 May 2022, 12:50 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters