1. यशोगाथा

महिला शेतकऱ्याची कमाल! चक्क गायीच्या शेणापासून तयार केला नैसर्गिक कलर

दुर्गा प्रियदर्शिनी नामक महिलेने याचा असा काही अनोखा उपयोग साध्य करून दाखवला आहे की त्यामुळे तिची सगळीकडे चर्चा होत आहे. शेणखताचा वापर करत रंग बनवण्याचा अभिनव प्रयोग या महिलेने केला आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
शेणापासून पेंटची निर्मिती

शेणापासून पेंटची निर्मिती

women farmer success:ग्रामीण भागात शेतकरी बंधू शेतीसोबत शेती पूरक व्यवसायास देखील प्राधान्य देत असतात. प्रामुख्याने ग्रामीण भागात पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पशुपालनामार्फत दुग्धव्यवसाय केला जातो. शिवाय जनावरांच्या शेणाचा खत म्हणून वापर केला जातो. ज्याला आपण शेणखत असं म्हणतो. पिकांच्या वाढीसाठी आणि जमिनीचा पोत सुधारावा यासाठी शेणखताचा वापर केला जातो.

मात्र शेणाचा असा एक उपयोग आहे जो कदाचित तुम्हाला माहित नसेल. दुर्गा प्रियदर्शिनी नामक महिलेने याचा असा काही अनोखा उपयोग साध्य करून दाखवला आहे की त्यामुळे तिची सगळीकडे चर्चा होत आहे. शेणाचा वापर करत रंग बनवण्याचा अभिनव प्रयोग या महिलेने केला आहे. आजच्या या भागात आपण दुर्गा प्रियदर्शिनी यांची यशोगाथा पाहणार आहोत.

त्यांनी कशापद्धतीने गायीच्या शेणापासून पेंटची निर्मिती केली याविषयी जाणून घेणार आहोत. दुर्गा सामान्य गृहिणीचे जीवन जगत होत्या. मात्र तरीही आपली स्वतःची एक वेगळी ओळख असावी असं त्यांना नेहमी वाटत होतं. त्यांना विशेष करून शेती व्यवसायात रस होता. त्यातल्या त्यात दुग्धव्यवसायात. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, मला दुग्ध व्यवसाय करण्यास रस होता.

आता महाराष्ट्रातील योजना कर्नाटकमध्ये राबवणार;कर्नाटकच्या कृषी मंत्र्यांनी केले महाराष्ट्राचे तोंडभरून कौतुक

पशुपालनाचे काम शिकण्यासाठी मी हरियाणा येथील झज्जर गावात जायचे. त्यांनी इंटरनेटवर एक व्हिडिओ पहिला त्यात शेणापासून पेंट बनवले जात होते. शिवाय या कार्यात सरकार देखील मदत करत आहे. मग त्यांनी पशुपालन व्यवसाय सोडून पेंट्स बनवण्याच्या कामात पूर्णपणे आपले लक्ष केंद्रित केले. आणि या क्षेत्रात स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. शेणासाठी त्या गोठ्यातील तसेच इतर शेतकऱ्यांकडून शेण खरेदी करत असत. त्यातून कच्चा माल सहज मिळतो. शिवाय शेतकऱ्यांना देखील आर्थिक फायदा होतो.

शेणापासून पेंट ची निर्मिती-
प्रथम पाण्यात शेण समान प्रमाणात मिसळावे. त्यानंतर ट्रिपल डिस्क रिफायनरीमध्ये टाकून ते घट्ट केले जाते. पेंटचा आधार त्यात कॅल्शियम घटक जोडून तयार करण्यात येतो. व त्यापासूनच इमल्शन आणि डिस्टेम्पर बनवले जाते. हा पेंट बनवताना सुमारे शेणाचा 30 टक्के वापर केला जातो.  नैसर्गिक रंग मूळ रंगात मिसळल्याने हा पेंट पूर्णपणे सेंद्रिय बनतो.

अधिकाधिक लोक ऑरगॅनिक पेंट बद्दल जागृत व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. लोकांमध्ये ऑरगॅनिक पेंट बद्दल फारशी जागरूकता नसल्यामुळे याची मागणी देखील काही वर्गापुरती मर्यादित आहे. स्वतः दुर्गा या नैसर्गिक पेंट्सच्या मार्केटिंगसाठी खूप प्रयत्न करत आहेत. ओडिसामध्ये शेणापासून पेंट बनवण्याचा प्लांट हा एकमेव प्लांट आहे.

दुर्गा यांनी ओडिसासह छत्तीसगडमधील काही शहरांत मार्केटिंगचे काम करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय त्या कॉलेजेस आणि सेमिनारमध्ये जाऊन पेंटच्या फायद्यांविषयी भाषण देऊन जनजागृती करत आहेत. सामान्य स्त्री ची ही असामान्य कहाणी खरोखरच प्रेरणा देणारी आहे.

महत्वाच्या बातम्या:
अभियंत्याने जरबेरिया शेतीतून कसे कमावले लाखो; जाणून घ्या
धरण मोबदल्यात कोट्यावधींचा घोटाळा! शेतकऱ्यांच्या जागी बोगस व्यक्ती; तहसिलदारही अटकेत

English Summary: women farmers! Natural color made from cow dung Published on: 26 May 2022, 01:55 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters