रखरखत्या उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर आता सर्वचजण पावसाची वाट बघत आहेत. मात्र जून महिना उजाडला तरी राज्यात काही भागात ऊनच आहे. पोषक वातावरण असल्यामुळे यंदा राज्यात वेळेत तसेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता.असं असलं तरी पाऊस लांबणीवर गेल्याचं चित्र दिसत आहे. मात्र काही भागात उशिरा का होईना पावसाला सुरुवात झाली आहे.
राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग तसेच जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. यंदा अति तापमान, तर कधी वादळी वारा, तर कधी अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे खरिपाला पोषक असे वातावरण तयार झाले आहे. मात्र अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या भाज्यांचे बरेच नुकसान केले आहे. इतर पिकांपेक्षा यंदा शेतकऱ्यांना भाजीपाल्यामुळे थोडासा दिलासा मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात तर गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतामधील बांध फुटले आहेत. तसेच शेतजमीन खरडून गेली आहे. मंचरच्या रविवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी अचानक पाऊस बरसल्याने भाजीपाल्याचे बरेच नुकसान झाले आहे. सध्या शेतीमालापेक्षा भाजीपाल्यालाच चांगला दर आहे. त्यामुळे यातून तरी थोडाफार आर्थिक हातभार लागेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र शेतकऱ्यांची दुष्काळात तेरावा अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर मोदींचा महाराष्ट्रात दौरा; या कार्यक्रमांना लावणार हजेरी
पावसामुळे भाजीपाल्याचा दर्जा खालावला
गेले तीन दिवस आंबेगाव तालुक्यात पाऊस पडत आहे. सध्या पावसामुळे आता खरिपाला पोषक असे वातावरण तयार झाले आहे. शेती शिवारात पाणी साचून अनेक ठिकाणी बांधही फुटले आहेत. मात्र काहींसाठी हा पाऊस नुकसानीचा ठरत आहे. अचानक बरसणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीदेखील
तारांबळ उडाली. मात्र शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या पालेभाज्यांचे यात बरेच नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक: विजेची तार अंगावर पडून 11 जनावरे जीवाला मुकली
डर के आगे जीत है! कांद्याने रडवले तर पातीने हसवले; वाचा भन्नाट शेतकरी दाम्पत्याची यशोगाथा
Share your comments