Cotton Crop: यंदा कापूस उत्पादकांचे (Cotton Growers) अच्छे दिन येणार असल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक भागातील कापसाची पिके उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे कापूस उत्पादनात घट (production decline) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापसाला गेल्यावर्षी 14 हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता. तसेच हा भाव तब्बल वर्षभर टाकूनही राहिला आहे.
येत्या हंगामात कापूस उत्पादकांना आणखी वाढीव भाव मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही भागातील मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी दुष्काळ परिस्थितीमुळे कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यंदाच्या वर्षी विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) मान्सूनच्या पावसाने कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागातील शेतकरी पुन्हा एकदा कापसाची लागण करणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून (Department of Agriculture) वर्तवण्यात येत आहे.
पोस्ट ऑफिसची अफलातून योजना; 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतोय 35 लाख रुपयांचा नफा
देशात कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र हे 126 लाख हेक्टर असताना यंदा 124 लाख 50 हजार हेक्टरावर लागवड झाली आहे. दर दुसरीकडे यंदाच्या हंगामात 370 लाख गाठींचे उत्पादन होईल असा अंदाज केंद्रीय कृषी विभागाने व्यक्त केला होता. पण घटत्या क्षेत्राबरोबर कापसाचे उत्पादनही 345 लाख गाठींपर्यंतच जाईल असा अंदाज आहे.
भारतात जरी मुसळधार पावसाने कापूस पिके गेली आहेत. तसेच अमेरिकेत दुष्काळामुळे कापूस पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात मोठी घट निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाला सोन्याचा भाव मिळण्याची शक्यता आहे.
Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची उद्यापासून विक्री सुरू; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये
अमेरिकेत 25 लाख गाठींनी उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक कापसाची गाठ ही 170 किलोची असते. इतर देशांमध्ये उत्पादन घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापसाच्या मागणीत वाढ होणार आहे. त्याचा फायदा भारतीय व्यापारी आणि शेतकऱ्यांना देखील होणार आहे. बाजारसमित्यांमध्ये आताच कापसाला 10 हजार 300 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
सावधान! महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये लंपी रोगाचा फैलाव, 11 लाखांहून अधिक जनावरे बाधित
या लोकांना आज मिळणार बाप्पाचा आशीर्वाद; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Share your comments