राज्यात लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग जास्त प्रमाणात झाला होता. त्यामुळे तब्बल वर्षभर जनावरांची खरेदी-विक्री बंद होती. तरीही त्याचा संसर्ग कालांतराने कर्नाटकात सीमाभागातही वाढत गेल्याने पशुपालक धास्तावले. अनेकांची जनावरे यामध्ये दगावली होती.
लम्पी स्कीनमुळे तब्बल एक वर्ष विविध ठिकाणचे जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय पशुवैद्यकीय विभाग व प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे या कालावधीत पशुपालकांसह शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
दरम्यान, निपाणी तालुक्यात गतवर्षी लम्पी स्कीनने २२५ जनावरांचा मृत्यू झाला होता. पशुवैद्यकीय विभागाने तपासणी करून प्रशासनाला अहवाल सादर केला होता. यामुळे मदत कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
त्यातील १८० मृत जनावरांच्या पालकांना पहिल्या टप्प्यात नुकसानभरपाई मिळाली. भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या उर्वरित ४५ पशुपालकांनाही येत्या चार दिवसांत भरपाई मिळणार आहे.
अखेर शेतकरी वाट बघत असलेली बातमी आलीच! आता शेतीचे पंचनामे होणार अचूक आणि जलद, अँपची झाली निर्मिती
जनावरांचा खरेदी-विक्री व्यवहार ठप्प झाल्याने नुकसान सहन करावे लागले होते. तालुक्यातील अनेक बाजार बंद असल्याने जनावरांच्या बाजाराशी संलग्न व्यवसायही बंद होते. या व्यावसायिकांनाही इतर कामे करावी लागली.
लासलगावात टोमॅटोला प्रतिक्रेट ५,१०० रुपये दर, टोमॅटोला दर टिकून असल्याने शेतकरी सुखावला...
Share your comments